facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / आवक घटली, दर वाढले
aawaz-news-image

आवक घटली, दर वाढले

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – नोटाबंदीनंतर चलन तुटवड्यामुळे उलाढाल ठप्प असल्याने व आवक मोठी असल्याने या आठवड्यापर्यंत पालेभाज्यांचे दर घसरले होते. आता ते पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आता आवक कमी असल्याने दर वाढत असून, आणखी काही दिवसांत गेल्या महिन्यातील दरांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. त्याचवेळी तूरडाळीची टंचाई जाणवू लागल्याने दर पुन्हा १४० रुपयांवर गेला आहे. याबरोबर ज्वारी व गव्हाचे दरही वाढले आहेत.

दिवाळीपासून बाजारात शांतता जाणवत होती. आवक चांगली असल्याने टोमॅटोचे दर तर पाच रुपये किलोपर्यंत आले होते. नोटा रद्दच्या निर्णयादरम्यान पालेभाजी, सिमला मिरची, वांगी, गाजर यांची आवक वाढली होती. शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने शेवटी अनेकांनी बाजारात भाज्या आणणे बंद केले. यामुळे होलसेलपासून किरकोळ विक्रीच्या ठिकाणी आवक कमी झाली. त्यामुळे बाजारात टंचाईसदृश वातावरण असल्याने भाज्यांचे दर हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. मेथीच्या तीन पेंड्या दहा रुपयांना दिल्या जात होत्या. आता दहा रुपयांना दोन पेंड्या मिळत आहेत. सिमला मिरचीची आवकही कमी झाल्याने दर तीस रुपयांवर पोहोचला आहे. वांगी, दोडका, कारली, भेंडी यांचे दर २० रुपयांच्या आसपास होते. या आठवड्याच्या अखेरीस मात्र त्यांचे दर तीस ते चाळीस रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गाजराची आवक वाढली असली तरी दर ३० रुपये किलो कायम आहे. पुढील आठवड्यात आणखी दर वाढण्याचा अंदाज आहे.

किराणा बाजारात फार मोठी उलाढाल झाली नव्हती. मात्र वाहतूकधारांना भेडसावणाऱ्या पैशांच्या समस्यांमुळे धान्याची व डाळींची आवक रोडावली आहे. त्यामुळे टंचाईचे वातावरण तयार झाले आहे. ज्वारीची आवक कमी असल्याने किलोला पाच ते सहा रुपयांपर्यंत दर वाढला आहे, तर तूरडाळीची टंचाई जाणवत आहे. या टंचाईमुळे तूरडाळीचे दर पुन्हा १४० रुपयांवर पोहोचले आहेत. पॅकिंगमधील आट्याच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, किरकोळ विक्रीच्या आट्याच्या दरात फरक पडलेला नाही. पुढील आठवड्यात आट्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Check Also

नव्या नेतृत्वाला मिळणार संधी

कोल्हापूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक गुरुवारी विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने संमत झाल्याने पुढील शैक्षणिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *