facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / मतदानाचा आज पहिला टप्पा
27-november-new-1

मतदानाचा आज पहिला टप्पा

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – राज्यात पहिल्या टप्प्यातील १६४ नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. सदस्यपदांच्या तीन हजार ७०५ व थेट नगराध्यक्षपदांच्या १४७ जांगासाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.

मतदारांची एकूण संख्या ५८ लाख ४९ हजार १७१ असून त्यासाठी सात हजार ६४१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्यांमधील १४७ नगर परिषदा व १८ नगर पंचायतींसाठी (एकूण १६५) मतदान होणार होते; परंतु शिराळा (जि. सांगली) नगर पंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता १७ नगर पंचायतींसाठी मतदान होईल; तसेच विविध ठिकाणी २८ उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यामुळे सदस्यपदाच्या तीन हजार ७०५ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *