facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / अनिल पाटील यांना आ. चौधरींची मारहाण

अनिल पाटील यांना आ. चौधरींची मारहाण

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – अमळनेर शहरात पालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच आर. के. नगरातील मतदान केंद्रावर रविवारी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर हाणामारीत होऊन आमदार चौधरी यांनी मारहाण केल्याने अनिल पाटील गंभीर जखमी झाले. पाटील यांना तातडीने धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने आमदार चौधरी यांच्या कार्यालयासह नंदुरबार रजिस्ट्रेशन असलेल्या गाड्या अडवून त्या फोडण्यास सुरुवात केल्याने तणाव निर्माण झाला.

आर. के. नगरातील केंद्रावर राजकीय विरोधक असलेले आमदार शिरीष चौधरी आणि जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील समोरासमोर आले. यावेळी एकमेकांना डिवचण्याच्या प्रयत्नातून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. संतप्त झालेल्या आमदारांनी पाटील यांना मारहाण केल्याने ते तेथेच खाली पडले. त्यांना तत्काळ हॉस्पिटलला हलविण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच पाटीलसमर्थकांचा जमाव घटनास्थळी जमला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *