facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / ‘कट्यार…’, ‘ख्वाडा’ची बाजी

‘कट्यार…’, ‘ख्वाडा’ची बाजी

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – यंदा मराठी फिल्मफेअर अॅवॉर्डचे मानकरी कोण ठरणार आणि सिनेसृष्टीतील कलाकारांची फेवरीट असलेली फिल्मफेअरची ‘ब्लॅक लेडी’ कोणकोणत्या कलाकारांच्या हातात विसावणार, याची उत्सुकता रविवारच्या ‘कर्म फिल्मफेअर अॅवॉर्ड‍्स मराठी २०१६’ या रंगारंग सोहळ्यात अत्यंत शिगेला पोचली आणि अखेर बाजी मारली ती ‘कट्यार काळजात घुसली’, ‘ख्वाडा’ व अन्य सिनेमांनी. शिवाय ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘मराठी फिल्मफेअर’चे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. रविवारी रात्री गोरेगावच्या फिल्मसिटीमधील रिलायन्स स्टुडिओमध्ये ‘कर्म फिल्मफेअर अॅवॉर्ड‍्स मराठी २०१६’चा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, सोनाली बेंद्रे, आलिया भट, सुप्रिया व सचिन पिळगावकर, नीना कुलकर्णी, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, मुक्ता बर्वे, पूजा सामंत आदी सिनेतारेतारकांच्या उपस्थितीत हा सोहळा तुफान रंगला.

जितेंद्र जोशी आणि पुष्कर श्रोत्री या लोकप्रिय जोडीसह अभिनेत्री क्रांती रेडकर या तिघांच्या खुसखुशीत सूत्रसंचालनाने या पुरस्कार सोहळ्यात रंगत भरली. त्याचबरोबर मृण्मयी देशपांडे हिचे फिल्मी गाण्यांवरील शास्त्रीयनृत्य, सोनाली कुलकर्णीचा सिंड्रेला थीमवरील अनोखा परफॉर्मन्स अशा कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षकांची अक्षरशः मने जिंकली. या भव्य सोहळ्याचे प्रक्षेपण कलर्स मराठीवर डिसेंबर म‌हिन्यात होईल.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *