facebook
Sunday , February 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘गप्प बस, संस्कृती’ आता चालणार नाही’

‘गप्प बस, संस्कृती’ आता चालणार नाही’

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – आतापर्यंतचा पिढीत पालकांना मुलांवर आपली मते लादता येत होती, मुलांनी काही गोष्ट करायचे म्हटले की, गप्प बस असं सर्रास पालक म्हणायचे. मात्र आताची पिढी खूप हुशार असून, परिणामी ‘गप्प बस संस्कृती’आता संपली आहे. मुलांचही स्वतंत्र आयुष्यात असत आणि ते त्यांना पालकांनी जगू दिले पाहिजे. मुलांवर रागविण्याऐवजी त्यांची समजूत घालायला पाहिजे मुलांना स्वतंत्र आयुष्य असते व त्यांना ते जगू द्यावे, असे प्रतिपादन स्मिता वळसंगकर यांनी सांगितले.

निमित्त होते पालक कार्यशाळेचं. आशा फांऊडेशनकडून लायन्स क्लब सभागृहात रविवारी (दि. २७) पालक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना वळसंगकर बोलत होत्या. याप्रसंगी जीवनसाथी अभ्यास मंडळाचे मुख्य संचालक अनिल भागवत, गरवारे बालभवनाच्या संचालिका शोभा भागवत, अनिल वळसंगकर व स्मिता वळसंगकर, आशा फांऊडेशनचे प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी हे उपस्थित होते.

आवडीचे शिक्षण घेऊ द्या

हल्ली व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांकडून आपल्या पाल्याला काय हवे आहे, काय नको याकडे विशेष असे लक्ष दिले जात नाही. परिणामी पाल्याची आवडही जाणून घेण्यात पालकवर्ग मागे पडतात. तसेच आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्या माथी न मारता मुलांना मुलांना आवडेल ते शिक्षण घेऊ द्या हा कल पालकांनी ठेवायला पाहिजे, असा सुरही पालक कार्यशाळेतून मान्यवरांच्या मार्गदर्शनातून समोर येत होता.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *