facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / छोट्या उद्योगांचे प्रश्न केंद्र सोडविणार

छोट्या उद्योगांचे प्रश्न केंद्र सोडविणार

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्लॅनिंग समितीच्या शिफारशीनुसार उपाययोजना करून छोट्या उद्योगांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे (एमएसएमई मंत्रालय) विकास आयुक्त सुरेंद्रनाथ त्रिपाठी यांनी दिले.
फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ स्केल इंडस्ट्रिजच्या (फासी) शिष्टमंडळाने दिल्लीत त्रिपाठी यांची भेट घेतली. याप्रसंगी बोलत होते. छोट्या उद्योगांच्या प्रगतीसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात फासीचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजितसिंग गुलाटी यांनी निवेदन देऊन चर्चा केली.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना व चालना देण्यासाठी एमएसएमई विभागातर्फे नवीन समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे चेअरमन प्रभातकुमार असून समिती वर्षाखेर अहवाल सादर करून शिफारशी करणार आहे. याप्रसंगी फासीचे राष्ट्रीय सचिव व्ही. एस. नरसिंमन, माजी अध्यक्ष राजा गोपाल, एस. एस. राठी, कोषाध्यक्ष आर. एल. देशपांडे, कृष्णा भट्टाचार्य, अर्जुन गायके, बप्पा चक्रवर्ती आदींची उपस्थिती होती.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *