facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / टार्गेट साडेचार लाखांचे, शौचालये बांधली एक लाख

टार्गेट साडेचार लाखांचे, शौचालये बांधली एक लाख

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – वेळेत पूर्ण होईल ती शासनाची योजना कशी ? अशीच काहीशी स्थिती मराठवाड्यात स्वच्छ भारत मिशनची असून ग्रामीण भागात बांधण्यात येत असलेल्या शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करताना प्रशासनाला घाम फुटला आहे. वर्ष २०१६-१७ मधील साडेचार लाख शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट केवळ २२.३७ टक्केच पूर्ण झाले आहे. अवघ्या चार महिन्यात उर्वरित उद्दिष्ट कसे पूर्ण होणार हा प्रश्न आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात शौचालये नसल्याने नागरिकांना उघड्यावरच विधी उरकावा लागतो. मराठवाड्यात २०१६-१७ या वर्षासाठी ४ लाख ५२ हजार ५१४ उद्दिष्ट देण्यात आले होते, मात्र यापैकी केवळ १ लाख १ हजार २२५ कुटुंबांकडेच शौचालये बांधण्यात आले असल्याचा सरकारी आकडा सांगतो. २०१९ पर्यंत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट असले तरी प्रशासनाच्या कासवगतीकडे पाहता हे टार्गेट वेळेत पूर्ण करण्याबाबत शंका आहे. शासनाकडून या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक घरासाठी प्रोत्साहनपर १२ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. मात्र केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मराठवाड्यात योजनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी निधीअभावी अनेक कामे रखडली होती. मात्र, प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांना देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे, पण केवळ जिल्हास्तरावरील ढिसाळ नियोजनामुळे काम कासवगतीने होत आहे.

बीड, उस्मानाबाद जिल्ह्याची पिछाडी

ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी २०१६-१७ या वर्षासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टामध्ये बीड आणि जालना जिल्ह्याची पिछाडी झाली आहे. बीड जिल्ह्यात वर्षभरात ७९ हजार ४११ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते. मात्र जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर केवळ ११ हजार २३४ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले. उस्मानाबाद जिल्ह्याला देण्यात आलेल्या ४५ हजार ७५३च्या तुलनेत केवळ ५ हजार ६१० शौचायले बांधले आहेत.

जिल्हानिहाय स्थिती
जिल्हा………..उद्दिष्ट…..साध्य…..टक्के
औरंगाबाद……६५३९६…..१६६५७…२५.४७
जालना……….७३९८३…..१६४७१….२२.२६
परभणी………५३४७४……११३५०….२१.२६
हिंगोली………२८२८०……९०१९……३१.८९
नांदेड…………४८८२२……१५१८५….३१.१०
बीड…………..७९४११……११२३४….१४.१५
लातूर………..५७३९५……१५६९९…..२७.३५
उस्मानाबाद..४५७५३…….५६१०……१२.२६
एकूण……….४५२५१४…..१०१२२५…२२.३७

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *