facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / टॅलेन्ट आहेच, गरज योग्य प्रशिक्षकांची

टॅलेन्ट आहेच, गरज योग्य प्रशिक्षकांची

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – ‘ऑलिम्पिकमध्ये कामगिरी गाजवू शकेल असे टॅलेन्ट भारतात आहे. मात्र, या टॅलेन्टला योग्य प्रशिक्षकाची गरज आहे. खेळांमध्ये उत्तम कौशल्य असलेल्यांना योग्य प्रशिक्षणाची जोड मिळाली तर असे तारे ऑलिम्पिकमध्ये नक्कीच चमकतील’, असा विश्वास व्यक्त करत भारतात चांगल्या प्रशिक्षकांचा अभाव असल्याची खंत ज्येष्ठ ऑलिम्पिक धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली.

नागपूरकरांना आरोग्याचा संदेश देण्यासाठी आणि माझी मेट्रो पर्यावरणपूरक असल्याचे पटवून देण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्यावतीने रविवारी माझी मेट्रो नागपूर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. मिल्खा सिंग यांची उपस्थिती हे या स्पर्धेचे खास आकर्षण होते. ‘फ्लाइंग सीख’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मिल्खा सिंग यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी नागपुरातील खेळाडूंना मिळाली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, मेट्रोचे व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, एनआयटीचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, नागपूर ऑरेंजसिटी रनर्स सोसायटीचे संचालक प्रशांत गुर्जर आदी उपस्थित होते. ‘मेहनतीशिवाय कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत नाही. यशस्वी माणसाची सुरुवात फार लहान स्तरापासून झालेली असते. ध्येय निश्चित असल्यास कितीही कठीण काम असले तरी यशश्री खेचून आणता येते. मुलांना यशस्वी बनविण्यासाठी मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना दुप्पट मेहनत घ्यावी लागते. माझ्यासारखे आणखी मिल्खासिंग या भूमीतून तयार व्हावेत आणि त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे’, अशी इच्छा मिल्खासिंग यांनी व्यक्त केली. केवळ चर्चेतून काही साध्य होणार नाही. शालेय स्तरावरच मुलांना खेळण्यासाठी विशिष्ट वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. विदेशी प्रशिक्षकांचाच अधिक गवगवा केला जातो. चीनमध्ये वयाच्या ८ वर्षांपासूनच खेळावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. भारतातही तसे धोरण राबविण्याची गरज असून शासनाला याबाबत पत्र पाठविले आहे’, असे मिल्खा सिंग यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *