facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / नगरपालिकांसाठी मतदान शांततेत; आज मतमोजण्‍ाी

नगरपालिकांसाठी मतदान शांततेत; आज मतमोजण्‍ाी

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – जिल्ह्यात सहा नगरपालिकांसाठीचे रविवारी (दि. २७) मतदान उत्साहात पार पडले. मतदारांनी थंडीमुळे सकाळी काहीसा निरूत्साह दाखविला. मात्र दुपारनंतर त्यांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा केलेल्या दिसून आले. सटाण्यात ऐतिहासिक ७५.४५ टक्के मतदानाची नोंद केली गेली. तर सर्वात कमी मतदान हे मनमाड नगरपालिकेसाठी ६८.०६ इतके झाले आहे. आज मतमोजणी असून अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. जिलह्यातील नागरिकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

मनमाड : मनमाड व नांदगाव नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी उत्साहात मतदान झाले. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले नांदगाव येथे ६९.३३ तर मनमाडमध्ये सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनमाडमध्ये थेट नगराध्यक्षसह ३१ नगरसेवकपदासाठी असलेल्या १६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले रविवारी मतमोजणी असल्याने सर्वाना निकालाची उत्सुकता लागली आहे.

प्रारंभी संथ सुरुवात

मनमाडमध्ये मतदानाला सकाळी प्रारंभ झाल्यानंतर मतदारात सुरुवातीला निरुत्साह दिसून आला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत अवघे वीस टक्के तर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान झाले. मात्र दुपारी चार वाजेनंतर मतदानाने वेग घेतला व बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. मनमाडमधील

सेंट झेवियर हायस्कुल इंडियन हायस्कुल या मतदान केंद्रांवर साडेपाच वाजता मतदारांची गर्दी असल्याने त्यांना चिठ्ठ्या देऊन मतदान केंद्रात प्रवेश देण्यात आला व त्यांचे मतदान घेण्यात आले.सायंकाळी साडेसात पर्यंत या केंद्रावर मतदान सुरू होते. इंडियन हायस्कूल गुरुगोविंद सिंग विद्यालय, उर्दू हायस्कूल या मतदान केंद्रांवर स्त्री-पुरुष मतदारांची गर्दी दिसून आली. सेंट झेवियर्स येथे रिपाई उमेदवार व अपक्ष उमेदवार यांच्या समर्थकात वादाचे प्रकार घडले. मात्र त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

नांदगावला ६९ टक्के मतदान

नांदगाव येथे थेट नगराध्यक्षसह ८ प्रभागाच्या १७ नगरसेवकपदासाठी शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान झाले तसेच कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. ६९.३३ टक्के मतदान झाल्याचे व सर्वात जास्त ८० टक्के मतदान प्रभाग क्रमांक १ मध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदगाव मध्ये सकाळी विविध मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. दुपारी साडेचार वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान झाले. नंतर ते ७० टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचले. सकाळी १० वाजता मतमोजणी होणार असून मतमोजणी तयारी पूर्ण झाल्याचे प्रांत भीमराज दराडे यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्तात मतदान

गेल्या आठवड्यात झालेल्या हाणामारीतील संशयित व नगरसेवक पदाचे उमेदवार याना मालेगाव येथून पोलिस बंदोबस्तात मनमाड येथे मतदानासाठी आणण्यात आले त्यांनी जयश्री थिएटर नजीक मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत अजय मोरे, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी मतमोजणी तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली.

नावे नसल्याने निराशा

मनमाड येथील रहिवासी असणारे व सध्या नाशिक ला असणारे अभियंता पराग पाटोदकर व त्यांच्या पत्नी गीता पाटोदकर हे दाम्पत्य नाशिकहून खास मतदान करण्यासाठी शनिवारीच मनमाडला आले. मात्र रविवारी ते मतदानाला गेले असता त्यांची नावे मतदार यादीतच नसल्याने त्यांना धक्का बसला. आपली नावे कोणी व का वगळली असा प्रश्न त्यांना पडला. याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *