facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / नाग नदीचा उलगडला इतिहास

नाग नदीचा उलगडला इतिहास

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – नागपूरची कायमची ओळख असलेल्या नाग नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंतचा प्रवास उलगडण्याचा उपक्रम रविवारी शहरात आयोजित करण्यात आला होता. नाग नदीचे ऐति‌हास‌िक महत्त्व, त्यात होत गेलेली स्थित्यंतरे आणि अलीकडच्या काळात त्याला आलेले स्वरूप अशा विविध विषयांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

भारतीय नदी दिवसानिमित्त नागपुरात २६ आणि २७ नोव्हेंबर असे दोन दिवस ‌विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पर्यावरण क्षेत्रातील अरण्य पर्यावरण संस्था, इकॉलॉजिकल सोसायटी, वाइल्ड-सीईआर व निसर्गायण या संघटना या आयोजनात सहभागी झाल्या होत्या.

‘उगम ते संगम’ या प्रवासाचा प्रारंभ नाग नदीचा उगम असलेल्या लाव्हा गावातून करण्यात आला. नदीच्या परिसंस्थेचे अध्ययन यावेळी करण्यात आले. विविध टप्प्यांवर नदीचे रुपांतर मलजलवाहिनीत कसे होते याचा अनुभव याप्रवासादरम्यान घेण्यात आला. या प्रवासात गावकऱ्यांशी वार्तालाप करण्यात आला तसेच युवकांशी संवादही साधला गेला. नदीचा एकंदरीत इतिहास, तिची भौगोलिक रचना, तिचे नैसर्गिक प्रवाह, तिच्या उपवाहिन्या, तिच्या तटावर असलेली परिसंस्था, जैवविविधता, कालांतराने घडलेले बदल, आजची दयनीय अवस्था व भविष्यात करण्याजोग्या शाश्वत उपाययोजना या बद्दलही यावेळी विचारमंथन करण्यात आले. यशवंत स्टेडियम परिसरात या प्रवासाची सांगता करण्यात आली. या प्रवासादरम्यान प्रद्युम्न सहस्रभोजनी यांचे दृक-श्राव्य मार्गदर्शनही झाले. या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उपस्थितांनी कविता सादरीकरण, अनुभव कथन तसेच नदीविषयीच्या भावना व्यक्त केल्या. नदी संवर्धनासाठी सर्वजन स्वतःच्या घरापासून बदल घडवून आणण्याचा निर्धार करीत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. इकॉलॉजिकल सोसायटीच्या प्राची माहूरकर व अरण्य पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज मदनकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *