facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / लोकांनी बँका लुटल्या तर गोळ्या घालणार का?

लोकांनी बँका लुटल्या तर गोळ्या घालणार का?

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – सातार चे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्याचा दाखला देत शिवसेनेने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. लोकांनी जगण्यासाठी उद्या बँका लुटल्या तर सरकार त्यांना गोळ्या घालणार आहे का?, असा थेट सवालच शिवसेनेने विचारला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून नोटाबंदीवर उघडपणे टीका करणारे उदयनराजे भोसले यांचे जाहीर अभिनंदन केले आहे. ‘नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात आक्रोश आहे. गरीब, कष्टकर्‍यांचे प्रचंड हाल होत आहेत. कष्टाचे पैसे मिळत नसल्याने जगणे मुष्कील झाले आहे. लोक हे सर्व आज सहन करीत असले तरी त्यांच्या मनात प्रचंड संताप आहे. हे असेच ५० दिवस चालू राहिले तर लोकांचा उद्रेक होईल आणि लोक बँका फोडतील,’ असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला होता. त्याचा उल्लेख करत उद्धव यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

उद्धव म्हणतात…

– उदयनराजेंनी महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेच्या आक्रोशाला तोंड फोडले आहे. नोटाबंदीनंतरची खरी परिस्थिती त्यांनी सांगितली आहे. सातार्‍यात ब्रिटिशांविरुद्धचे पत्री सरकार स्वातंत्र्यपूर्व काळात बँका व सरकारी खजिना लुटत होते. त्याच सातार्‍यात सरकार उदयनराजे यांनी सरकारला त्याच शब्दात इशारा दिला आहे…”लोक जगण्यासाठी बँका लुटतील”…तसं झालं तर लोकांना स्वकीयांचेच सरकार गोळ्या घालणार काय?

– लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय पोस्टरबाजी केली. मोदी यांना शिवाजीराजांचे आशीर्वाद असल्याची पोस्टर्स सर्वत्र लागली होती, पण छत्रपतींच्या वंशजांनीच आता मोदी सरकारला जाब विचारला आहे. हिंमत असेल तर सरकारने उदयनराजे यांच्या वक्तव्यास आव्हान द्यावे.

– पंतप्रधान मोदी यांच्या ‘नोटाबंदी’ निर्णयानंतर ग्रामीण भागातील जनतेचे जे हाल सुरू आहेत ते भयंकर असले तरी एकही ग्रामीण पुढारी तडफेने यावर उसळून बोलायला तयार नाही. जुन्या नोटांच्या ढिगार्‍याखाली यापैकी अनेकांचे हात अडकले आहेत. म्हणूनच उदयनराजे यांची तळमळ दखल घेण्यासारखी आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *