facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / संगमनेरमध्ये शांततेत ७४ टक्के मतदान

संगमनेरमध्ये शांततेत ७४ टक्के मतदान

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी शांततेत ७४ टक्के मतदान झाले. सुमारे २६ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी काहीसे संथगतीने मतदान सुरू होते; मात्र, दुपारी चारनंतर मतदानाचा वेग वाढला आणि केद्रांवर मतदारांची गर्दी झाली.

येथील नगरपालिकेच्या १४ प्रभागांतून २८ उमेदवार निवडून द्यायचे असून रविवारी सकाळी ७.३० पासून ६२ बूथच्या माध्यमातून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते १.३० या वेळेत एकूण मतदारांपैकी ९ हजार १५९ पुरुष व ८ हजार ११७ महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे दीड वाजेपर्यंत ३६ टक्के मतदान झाले तर ७.३० ते ३.३० या वेळेत १३ हजार ४९२ पुरुष व १२ हजार ५०६ महिलांनी म्हणजे ५४ टक्के मतदारांनी मतदान केले. तर दुपारी चारनंतर मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, शिवसेनेचे अप्पा केसकर, भाजपचे ज्ञानेश्वर करपे यांनी मतदान केले. दिवसभर शांततेत मतदान सुरू होते. निवडणूक अधिकारी भागवत डोईफोडे व सहायक निवडणूक अधिकारी रावसाहेब सोनवणे हे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. मतदानाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त होता. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मतदान केंद्रांवर मोठी गर्दी व रांगा लागल्या होत्या.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *