facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / संविधान सन्मान मूक मोर्चाला पुण्यात मोठा प्रतिसाद

संविधान सन्मान मूक मोर्चाला पुण्यात मोठा प्रतिसाद

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – संविधान दिनाचे औचित्य साधून दलित, ओबीसी, आदिवासी, भटक्या-विमुक्त आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत काढलेल्या संविधान सन्मान मूक मोर्चासाठी रविवारी पुण्यात जनसागर लोटला. तरुणी आणि महिलांची लक्षणीय संख्या असलेल्या या मूक मोर्चाद्वारे एकीचा हुंकार उमटला आणि शिस्तीचे अनोखे दर्शन घडवले गेले.

डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला विद्यार्थिनींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाला आरंभ करण्यात आला. संविधानाच्या प्रस्तावनेचे आणि मागण्यांचे वाचन करून हा मोर्चा खंडुजीबाबा चौकातून दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सुरू झाला. मोर्चात सर्वांत पुढे तरुणी, महिला आणि त्यानंतर पुरूष होते. लक्ष्मी रस्त्यामार्गे मोर्चा विधानभवनापर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला. त्यामध्ये तरुणी आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने होता. काही अपंग तरुण आणि तरुणीदेखील दुचाकीवरून मोर्चात सहभागी झाले होते. महात्मा जोतिबा फुले, गाडगेमहाराज यांची वेशभूषा करून काही तरुणांनी सामाजिक समतेचा संदेश दिला.

मोर्चाच्या मार्गात ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संयोजकांकडून सतत सूचना देण्यात येत होत्या. स्वच्छता आणि शिस्तीचे अनोखे दर्शन घडवून हा मोर्चा दुपारी पावणेतीनच्या सुमारास विधानभवन येथे पोहोचला. त्यानंतर तरुणींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरव राव यांना दिले. त्या शिष्टमंडळामध्ये सृष्टी वाडेकर, संध्या सोनवणे, निहा शेख, आकांक्षा नवले, चैताली गायकवाड, अमिषा सोंडे, मयुरी कांबळे, नबिला तांबोळी, विजयालक्ष्मी पल्लेवर यांचा समावेश होता.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यावर जाहीर सभा घेण्यात आली. त्यामध्ये भाग्यश्री पुरणे, सना अन्सारी, पिंकी वाजे आदी तरुणींनी विचार व्यक्त केले. राष्ट्रगीताने दुपारी साडेचारच्या सुमारास मोर्चाची सांगता झाली.

स्वच्छता आणि बंदोबस्त

विविध राजकीय पक्षांचे नेते हे राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवत मोर्चात सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे सहभागी झाले होते. मोर्चाच्या मार्गात कोठेही कचरा होणार नाही, याची दक्षता संयोजकांकडून घेण्यात येत होती. तरुणी आणि महिलांना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्याचे काम स्वयंसेवकांकडून करण्यात येत होते. या मोर्चासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *