facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / सटाण्यात ७५.४५ टक्के मतदान

सटाण्यात ७५.४५ टक्के मतदान

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – सटाणा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अटीतटीच्या लढतीसाठी झालेल्या मतदानात पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक ७५.४५ टक्के इतके मतदान झाले आहे. यामुळे विजयाचे समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. वाढलेल्या या मतदानामुळे सत्ताधारी पक्षाला डोकेदुखी ठरते की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोणत्याही स्वरूपाचे गालबोट न लागता अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.

या निवडणुकीत शहरातील सुमारे एकुण २८,२९२ मतदारांपैकी २१,७४३ मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. पालिकेसाठी एकूण ७५.४३ टक्के मतदान झाले आहे. पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी पाच तर प्रभागातील २१ जागांसाठी ९२ उमेदवार रिंगणात उभे होते.

येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील नवीन प्रशासकीय इमारतींमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणी करिता १० टेबल लावण्यात आले असून सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रांरभ करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली.

सटाण नगरपरिषदेच्या निवडणूकसाठी ३९ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. एकूण मतदारांपैकी २१,७४३ मतदान झाले. सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. २ मध्ये २,२९० तर सर्वाधिक मतदान प्रभाग क्र. ८ मध्ये झाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *