facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / सिन्नरला बाउंसरकडून कामगारांची अडवणूक

सिन्नरला बाउंसरकडून कामगारांची अडवणूक

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – सिन्नर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वत्र शांततेत मतदान झाले असून सुमारे ७०. ८६ टक्के मतदान झाल्याचे समजते. सायंकाळी उशिरा एकूण झालेले मतदान मोजण्याचे काम सुरू होते. शहरात मतदान केंद्रावर किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले.

सिन्नरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी जाऊ न देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिंदाल या एका कंपनीवर तैनात करण्यात आलेले दहा बाउंसर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांच्या मदतीने सुमारे २५० कामगारांना मतदानासाठी मुक्त करण्यात आले. या प्रकरणी कोणत्या पक्षाच्या उमेदवारासाठी सदरचे बाउंसर काम करीत होते, याची चौकशी पोलिस करीत आहे. तर दुसऱ्या घटनेत दुपारी दीड वाजता मोबाइलवरून ‘चाणक्य’ या नावाने एक्झीट पोलचा मेसेज सर्वत्र पाठवण्यात आला. यामध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार २००० हून अधिक मतांनी पुढे तर इतर २३ नगरसेवक भाजपचे, शिवसेना ४ अपक्ष १ असा मेसेज होता. या प्रकरणी शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली असून सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *