facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / कोकण रेल्वेवर तीन स्टेशने
news-2

कोकण रेल्वेवर तीन स्टेशने

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – कोकण रेल्वेने तीन नव्या स्टेशनांची घोषणा केली आहे. आतापर्यंत इंदापूर, सापे वामने, वेरावली या केवळ थांब्यांपुरत्या मर्यादित असणाऱ्या ठिकाणांना आता स्टेशनांचा दर्जा मिळणार आहे. त्याशिवाय लोटे परशुराम येथे रेल्वे कारखान्याचे भूमिपूजन केले जाणार असून कणकवलीत ‘आयआरसीटीसी’तर्फे ई-केटरिंग सुविधांची भर पडणार आहे. या तिन्ही सुविधांचे उद्घाटन एकाच दिवशी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होईल.

आतापर्यंत इंदापूर, सापे वामन, वेरावली या तिन्ही ठिकाणी मेल/एक्स्प्रेसना काही मिनिटांपुरता थांबा दिला जात होता. आता या स्टेशनांवर तिकीटविक्रीसह अन्य सुविधा मिळतील.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *