facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / चाकूहल्ल्यातील तीन गुंडांची धिंड
aawaz-news-image

चाकूहल्ल्यातील तीन गुंडांची धिंड

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – लक्ष्मीपुरीतील पद्मा चौकात रिक्षाची तोडफोड करून पार्वती टॉकीजजवळ एकावर चाकू हल्ला करणाऱ्या तीन गुंडांची पोलिसांनी रविवारी (ता. २७) यादवनगरातून धिंड काढली. फिरोज यासिन मुल्ला (वय २७), मुजबिन खुदबुद्दीन कुरणे (२८, दोघेही रा. यादवनगर) आणि स्वप्निल सातपुते (रा. यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. यातील मुल्ला आणि कुरणे या दोघांना कोर्टात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शनिवारी (ता. २६) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास लक्ष्मीपुरीतील पद्मा चौकात रिक्षाचे भाडे देण्याच्या वादातून निवृत्ती शंकर कांबळे (वय ५६, रा. पाचगाव) या रिक्षाचालकाला मद्यधुंद तरुणांनी मारहाण केली होती. त्यानंतर तासाभरातच या गुंडांनी प्रमोद हंबीरराव देवकर (वय ४०, रा. सम्राटनगर) यांच्यावर चाकू हल्ला केला होता. गुंडांनी दहशत माजवून दोन ठिकाणी मारहाण केल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. राजारामपुरी पोलिसांनी मुल्ला आणि कुरणे या दोघांना शनिवारी रात्रीच अटक केली. पसार झालेला गुंड स्वप्निल सातपुते याला रविवारी सकाळी ताब्यात घेतले.

मुल्ला आणि कुरणे या दोघांना कोर्टात हजर केले असता, त्यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी रविवारी संध्याकाळी या तिघांचीही यादवनगर परिसरातून धिंड काढली. गुंड स्वप्निल सातपुते याला सोमवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.

Check Also

img

विविध संघटनांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

विविध राजकीय पक्ष, संघटनांसह शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रम, उपक्रमांतून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *