facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
aawaz-news-image

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – कृष्णा हॉस्पिटलमध्ये असलेल्या मुलीला पाहण्यासाठी जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या पाचवर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. २७) दुपारी पावणेबारा वाजता जळगावातील दूध फेडरशेनजवळ घडली.

शेखर वैजनाथ शर्मा (वय २५, रा. सुरेशदादानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातात ओम किरण शर्मा (वय ५) हा चिमुकला गंभीर जखमी झाला. जखमीवर डॉ. भंगाळे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शेखर शर्मा यांचे दोन वर्षापूर्वी मधू यांच्याशी विवाह झाला. त्यांना देवयानी ही मुलगी झाली.

देवयानी हिची प्रकृती खालाविल्याने तिला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शेखर यांचे भाऊ किरण शर्मा यांनी देवयानीला उपचारासाठी दाखल केले होते. ही माहिती मिळाल्यानंतर शेखर हॉस्पिटलमध्ये जात होते. शर्मा हे विना नंबरची ऍक्टीवावर ५ वर्षाचा मुलगा ओम सोबत जात होते. पेट्रोल भरल्यानंतर कृष्णा हॉस्पिटलकडे जात असताना महावीर नगरमधील दूध फेडरेशनजवळ ऍक्टीवाला ट्रकने धडक दिली. दहाचाकी ट्रक (एम.एच.४६ एफ ०५६८)च्या चाकाखाली शेखर शर्मा आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओम साईडला फेकला गेल्याने त्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. अपघात होताच ट्रकचालकाने घटनास्थळाहून पळ काढला.

नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. ओमला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकचालक मुन्नालाल सिताराम यादव (रा. जे.जे.रोड, शिवडणी, मुंबई) याला अटक केली आहे. या घटनेबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

news-1

नियमितीकरणासाठी फक्त एक रुपया

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगर शहरात खासगी व सरकारी खुल्या जागांवर असलेल्या सर्वधर्मिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *