facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / नोटाबंदीचा आज ‘आक्रोश’
aawaz-news-image

नोटाबंदीचा आज ‘आक्रोश’

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – केंद्र सरकारने अचानकपणे चलनातून ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द केल्याने सामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी डाव्या लोकशाही आघाडीतर्फे आज, सोमवारी आक्रोश निदर्शने करण्यात येणार आहेत. डाव्या लोकशाही आघाडीतर्फे सायंकाळी साडेचार वाजता शिवाजी पुतळा, शिवाजी चौक येथे निदर्शने होतील.

निदर्शनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावेत, असे आवाहन चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, सतिशचंद्र कांबळे, शंकर काटाळे, लक्ष्मण वायदंडे, दिलीप पोवार, अनिल चव्हाण आदींनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. दरम्यान, सोशल मिडियांमधून देशव्यापी बंद पुकारला आहे. कोल्हापूर बंद असल्याचे मॅसेज ‌मोठ्या प्रमाणात फिरत होते.

बाजारपेठेतील व्यापा‌ऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्रोश निदर्शनात विविध संस्था, संघटनांनी सहभागी होण्यासंबंधी प्रसिध्दी पत्रकातून माहिती दिली.

मात्र कोल्हापूर बंदचे आवाहन कोणत्याही संघटनेने अधिकृतपणे केलेल नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे बाजारपेठ सुरळीतपणे सुरू राहणार आहे. सोशल मीडियावरून फिरत असलेल्या मेसेजांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. अनेकांनी या आक्रोश आंदोलनाला आपला विरोध असल्याचे प्रतिमेसेज पाठवले आहेत. त्यामुळे नेमकी उद्या काय स्थिती असणार याविषयी उत्सुकता आहे.

‘राष्ट्रवादी’चा पा‌ठिंबा

कोल्हापूर : काँग्रेससह डाव्या लोकशाही आघाडीतर्फे सोमवारी करण्यात येणाऱ्या देशव्यापी आक्रोश निदर्शनास येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पा‌ठिंबा दिला. नोटबंदीमुळे शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. मध्यवर्ती सहकारी बँकांना कमी अर्थपुरवठा करून ग्रामीण जनतेची आर्थिक कोंडी केली आहे. त्यामुळे नोट बंदी विरोधात आक्रोश निदर्शनास कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पाठिंबा दिला आहे. निदर्शनात ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात‌ून केले आहे.

शेकापही करणार आंदोलन

दरम्यान, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांची उलाढाल थंडावली आहे. याविरोधात शेकापतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत झालेल्या बैठकीस बाबूराव कदम, एकनाथ पाटील, संतराम पाटील, मारूती सिताफळे, समरसिंह पवार, अमित कांबळे उपस्थित होते.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *