facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / राहुरीत ८० टक्के मतदान
news-10

राहुरीत ८० टक्के मतदान

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिकांच्या निवडणुकीत चुरशीने मतदान झाले असून उशिरापर्यंत मतदानांची प्रक्रिया सुरू होती. दुपारी तीननंतर मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दोन्हीही ठिकाणी ८० टक्के मतदान झाले.

रविवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. राहुरीत सकाळी पहिल्या दोन तासांत केवळ आठ टक्के मतदान झाले होते. दुपारी बारा वाजता १८ टक्के तर दोन वाजता ३४ टक्के आणि चार वाजता ६० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू राहील असा अंदाज होता. मतदान शांततेत व उत्साहात पार पडले. पैसे वाटपाचे सर्रास प्रकार घडत होते. वाटपानंतरच मतदार बाहेर पडले होते. शहरातील विद्या मंदिर प्रशाला, प्रगती विद्यालय, भागीरथीबाई तनपुरे विद्यालय, गाडगे महाराज आश्रम शाळा यासह ३६ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे, उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी बहुतांश ठिकाणी भेटी दिल्या. परिवर्तनचे उमेदवार रावसाहेब यादवराव तनपुरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी खिंड लढविली. संवेदनशील भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

राहुरी महाविद्यालयाच्या आवारात सोमवारी मतमोजणी करण्यात येणार असून प्रभागनिहाय तसेच नगराध्यक्षपदासह मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक अधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले. मतदान संपल्यानंतर कार्यकर्ते आमचाच उमेदवार विजयी होणार, असा दावा करीत होते. जनविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, परिवर्तनचे रावसाहेब तनपुरे यांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांनीही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंदीस्त झाले. काही ठिकाणी पैजांही लागल्या आहेत.

देवळाली प्रवरा येथेही दिग्गजांचे नशिब उद्या उघडणार असलयाने सर्वाचेच लक्ष लागले आहे. श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक बाविस्कर व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी मतदान केंद्रांवर पाहणी केली.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *