facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘आय-गेन’ची अंतिम फेरी गुरुवारी

‘आय-गेन’ची अंतिम फेरी गुरुवारी

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – गोखले एज्युकेशन सोसायटी २०१८ मध्ये शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून या निमित्ताने ‘आय-गेन’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी संस्थेच्या विविध कॉलेजांकडून अनेक शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्युनिअर कॉलेजांसाठी याचे आयोजन केले जाणार आहे.

संस्थेच्या केंद्रीय समन्वय समितीतर्फे २०१५ पासून संस्था पातळीवर सुगम संगीत, वक्तृत्व व काव्यवाचन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेज स्तरावर या स्पर्धांची प्राथमिक फेरी ऑक्टोबर महिन्यात पार पडली. तसेच आंतरमहाविद्यालयीन द्वितीय फेरी नोव्हेंबर महिन्यात त्या-त्या विभागांनुसार घेण्यात आली. या स्पर्धांची अंतिम फेरी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये १ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत संस्था पातळीवर मुंबई, पालघर, व नाशिक विभागातून यशस्वी ठरलेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *