facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / गेल्या दहा महिन्यांत अॅट्रॉसिटीचे ७१ गुन्हे

गेल्या दहा महिन्यांत अॅट्रॉसिटीचे ७१ गुन्हे

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ व १९९५अनुसार गेल्या दहा महिन्यांत ७१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आली.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक उपजिल्हाधिकारी कटके यांच्या दालनात झाली. ज्या गावात अॅट्रॉसिटीअंतर्गत खून, बलात्कार झाला अशा गावात महसूल, पोलिस, समाज कल्याण, ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सामंजस्य बैठका घेऊन तेथील जनजीवन सुरळीत चालू राहील, अशा उपाय योजना कराव्यात. फिर्यादींचे समुपदेशन करून कायद्याबाबत जागृती निर्माण करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी कटके यांनी संबंधितांना सूचना दिल्यात.
अॅट्रॉसिटीअंतर्गत एक जानेवारी ते ३० ऑक्टोबर २०१६ या कालावधीत ७१ गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये तीन खून, १४ बलात्कार, २० विनयभंग यांचा समावेश आहे. १५ प्रकरणे पोलिस तपासावर असून, पोलिसांनी याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. समितीचे सदस्य सचिव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जे. एस. एम. शेख यांनी गुन्ह्यांचा सद्यस्थितीतील आढावा सदस्यांसमोर मांडला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *