facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / जिल्ह्यात भाजप, शिवसेनेचे वर्चस्व

जिल्ह्यात भाजप, शिवसेनेचे वर्चस्व

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद निवडणुकीनंतर सोमवारी, (दि. २८) नगरपालिका निवडणुकीतदेखील भाजपने सात ठिकाणी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले. जिल्ह्यातील तेरा पैकी तीन ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तर चोपडा आणि अमळनेर शहरविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर रावेरला जनक्रांतीचे दारा मोहम्मद यांनी विजय मिळविला आहे. एकंदरीत या बारा नगरपालिका, एक नगरपंचायतीमध्ये भाजपने सात, शिवसेनेने तीन, शहर विकास आघाडीने दोन तर जनक्रांतीने एक जागा पटकावली आहे. निवडून आलेल्यात सहा महिला आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जबरदस्त पराभव पत्करावा लागला.

‘हा तर मोदींवरील विश्वास’

भाजपला उत्तर महाराष्ट्रात मिळालेले यश हे पक्षाच्या दृष्टीने मोठे असून मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी, सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर, आमच्या ताब्यात आलेल्या सात नगरपरिषदा यापूर्वी आमच्या ताब्यात नव्हत्या. राज्यातील यशात जळगाव जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. हे टीमवर्कचे यश आहे, कार्यकर्त्यांचे यश आहे. हा निकाल म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीच्या यशाने जिल्हा परिषदेसाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. रावेर ,धरणगाव येथील जागा खात्रीच्या होत्या, मात्र त्या थोडक्यात गेल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री मुख्यमंत्रीवर अवलंबून जिल्ह्याला या निवडणुकीत चांगले यश मिळाले. या पार्श्वभूमीवर तुम्हाला जळगावचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे काय, हे विचारता त्यांनी हा निर्णय मुख्यमंत्री व पक्षावर अवलंबून असल्याचे सांगितले.

भाजपने जिल्ह्यात मोठ्या संख्येने जागा घेत, बाहेरून कुणाची मदत न घेता जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले आहे. – आमदार एकनाथ खडसे, माजीमंत्री

निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला. मतदारांनी भाजपच्या विकासाला मते दिली असून मतदार भाजपशी एकरूप झाले आहेत. पूर्वी जिल्हयात भाजपचे ४२ नगरसेवक होते तर आता ९४ नगरसेवक, सात नगराध्यक्ष झालेले आहेत. एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या गेल्या. – उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *