facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / टोमॅटोने रडवले!

टोमॅटोने रडवले!

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – थंडीची चाहूल लागली की बाजारात रास्त दराने विकला जाणारा हा टोमॅटो आज चलनगोंधळामुळे दोन ते तीन रुपये किलोपर्यंत घसरला आहे. टोमॅटो सडून तो रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा पडेल किंमतीला तो विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

जुने चलन रद्द झाल्याने भाजीपाल्यांचे दर दिवसेंदिवस खाली उतरत आहेत. रोखीने तसेच उधारीवर घाऊक बाजारांमध्ये होणारे व्यवहार पन्नास टक्क्यांनी खाली आले असून टोमॅटोला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

जुन्नर, नारायणगाव, सांगली, सोलापूर येथून एपीएमसीमध्ये टोमॅटो येतो. शेतकऱ्याचा टोमॅटो पिकवण्याचा प्रत्यक्ष खर्च दहा रुपये आहे. नोटाबंदीमुळे टोमॅटोचा हा खर्च वसूल करणेही शेतकऱ्याला कठीण झाले आहे. घाऊक व्यापारी विक्रेता महासंघाचे प्रशांत जगताप यांना चलन बाजारामध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत हा गोंधळ सुरुच राहणार, असे वाटते. नाशिक बाजारसमितीचे व्यापारी संभाजीराव पाटील यांनी गेल्या आठवड्यात टोमॅटोचे ३५ क्रेट कमी दरामुळे फेकून दिल्याचे सांगितले. टोमॅटो दोन दिवसांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवता येत नाहीत, त्यांची विक्री दोन दिवसांत झाली नाही तर माल कुजतो. नोटांच्या गोंधळामुळे व्यापारी, ग्राहक, मध्यस्थ या सगळ्याच पातळ्यांवर शेतकऱ्यांचा तोटा वाढता आहे. नाशिक येथून एपीएमसी बाजारामध्ये प्रत्येक दिवशी ५० ते ५५ ट्रक भरून टोमॅटो येत असला तरीही मालाला उठाव नसल्याने तो आज दोन ते तीन रुपये किलो दराने घाऊक बाजारात विकण्यात आला. मात्र, किरकोळ बाजारामध्येही त्याची किंमत दहा ते पंधरा रुपये किलो होती.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *