facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / पुणे विभागातून ठरले ‘एम एच १२’ अव्वल

पुणे विभागातून ठरले ‘एम एच १२’ अव्वल

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून प्रयोग, पुणे या संस्थेच्या एम एच १२ जे १६ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे. एम एच १२ जे १६ या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. ७ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. स्पर्धेत २० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.
पुणे महानगर परिवहन महामंडळ नाट्य सेवा संघ, पुणे या संस्थेच्या ‘धुवाँ’ या नाटकाला द्वितीय तर, व्यक्ती, पुणे संस्थेच्या ‘कातळडोह’ नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले. एम एच १२ जे १६ नाटकाच्या दिग्दर्शनासाठी सुबोध पंडे यांस प्रथम, ‘धुवाँ’साठी द्वितीय जगन्नाथ निवंगुणे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.
प्रकाश योजनेसाठी श्रीकांत भिडे (न मिळालेले पत्र) यांना प्रथम, अक्षय पवळे (ट्रिपल सीट) यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक निश्रय अटल (एम एच १२ जे १६), द्वितीय पारितोषिक सुयश झुंजुरके (कातळडोह) यांना मिळाले. नरेंद्र वीर (धुवाँ) आणि आशिष देशपांडे (स्वराज्याचा चौथा खांब) यांना रंगभूषेसाठी प्रथम आणि द्वितिय पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक जयदीप मुजुमदार (एम एच १२ जे १६) आणि शर्वरी जाधव (धुवाँ) यांना मिळाले. अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शाल्वी बोरळकर, ऋतुजा गद्रे, श्रुती पेंडसे-गोडसे, शर्वाणी नाईक, सुधन्वा पानसे, धनंजय सरदेशपांडे, अमर गायकवाड आणि राहुल बेलापूरकर यांना मिळाले. परीक्षक म्हणून मधू जाधव, मुकुंद मराठे व कमल हावले यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *