facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / बनावट मतदार कार्ड; जालन्याचा उमेदवार रडारवर

बनावट मतदार कार्ड; जालन्याचा उमेदवार रडारवर

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – बनावट मतदार कार्ड प्रकरणात शहर पोलिसांच्या रडारवर जालना नगर परिषद निवडणूकीतील स्थानिक उमेदवार आहेत. या उमेदवाराची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, तयार करण्यात आलेल्या बनावट मतदार कार्डांमध्ये महिलांच्या ओळखपत्राची संख्या जास्त आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गुन्हेशाखेच्या पथकाने रहेमानिया कॉलनी भागात बनावट मतदार कार्ड तयार करणाऱ्या टोळीवर शनिवारी छापा टाकला होता. जालना नगर परिषद निवडणूक रविवारी होणार होती. या निवडणूकीसाठी ही मतदान कार्ड तयार करण्यात येणार होती. वसीम बॅटरी नावाच्या संशयित आरोपीचा नातेवाईक असलेला उमेदवार जालना येथील वॉर्ड क्रमांक १९ मध्ये निवडणूक लढवत होता. त्यासाठी बनावट मतदार कार्ड तयार करण्यासाठी मतदार याद्या व डेटा देत त्यांने औरंगाबादेत कंत्राट दिले होते. वसीम बॅटरी याने सिकंदर सय्यद अब्दुल मन्नान याला हे काम सोपवले होते. सिकंदर या मतदार याद्या ‌मोहम्मद रईस अब्दुल रहेमान याच्याकडे सोपवला होता. मात्र, पोलिसांना याची टीप मिळाल्याने मतदार कार्ड तयार करण्यापूर्वी टोळी पोलिसांच्या ताब्यात आली. दरम्यान जिन्सी पोलिस याप्रकरणाचा तपास करीत आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलिस जालना येथील संशयित उमेदवाराची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जे मतदार कार्ड तयार करण्यासाठी याद्या व डेटा पाठवण्यात आला होता. त्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम महिलांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *