facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / मुनगंटीवार, अहिरांना कामाची पावती

मुनगंटीवार, अहिरांना कामाची पावती

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – जिल्ह्यातील चार नगरपरिषद व एका नगरपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. सिंदेवाही नगरपंचायतीसह मूल नगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. बल्लारपूर व वरोऱ्यात भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले असले तरी भाजपला बहुमतासाठी मदत घ्यावी लागणार आहे. शिवसेनेने वरोऱ्यात भाजपला रोखण्यात यश मिळविले तर राजुऱ्याचा गड काँग्रेसने राखला आहे.

या निवडणुकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार , केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना कामाची पावती मिळाली आहे. तर काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार विजय वडेट्टीवार यांना जबर धक्का बसला आहे. वरोरा नगरपालिकेसाठी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर भाजपला रोखण्यात यशस्वी झाले असले तरी सत्ता काबीज करू शकले नाहीत. राजुरा नगरपालिकेसाठी भाजपचे आमदार संजय धोटे यांना धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार अतुल देशकर, काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी पुनरागमन केले आहे. आमदार बंटी भांगडिया यांना दिलासा मिळाला आहे.

 अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बल्लारपुरात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हरीश शर्मा यांनी बीआरएसपीचे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे) राजू झोडे यांचा १ हजार ९१६ मतांनी पराभव करत बल्लारपूर नगर परिषदेवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राजुरा नगरपालिकेचा गड काँग्रेसने राखला आहे. एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक झाली. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अरुण धोटे यांनी आमदार संजय धोटे यांचे बंधू सतीश धोटे यांचा १ हजार ४२० मतांनी पराभव केला. अरुण धोटे यांना ५ हजार ५६५ तर सतीश धोटे यांना ४ हजार १४५ मते मिळाली.वरोऱ्यात भाजपाचे नगराध्यक्ष उमेदवार एहेतेश्याम अली यांनी शिवसेनेचे पुरुषोत्तम खिरडकर यांचा ३ हजार ८९३ मतांनी पराभव केला. एकूण २४ जागांसाठी ही निवडणूक झाली. स्पष्ट बहुमतासाठी भाजपला तीन जागांची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांच्या गावात भाजपच

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव. याच नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामांना मूलवासियांनी कौल दिला आहे. १७पैकी १६ जागा मिळविल्या आहेत. भाजप उमेदवारांनी बहुमतासह सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार रत्नमाला भोयर यांनी काँग्रेसच्या उमेदवार लीना चिमड्यालवार यांचा ३ हजार ५६७ मतांनी पराभव केला आहे. भाजपाच्या रत्नमाला भोयर यांना ७ हजार ४०५ तर काँग्रेसच्या लीना चिमड्यालवार यांना ३ हजार ८३८ मते मिळाली आहेत. येथे काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

नगराध्यक्ष कुणाचे किती?
भाजप : ०३
राष्ट्रवादी : ००
शिवसेना : ००
काँग्रेस : ०१
एकूण : ०४

नगरसेवक कुणाचे किती?
भाजप : ३९
शिवसेना : १२
काँग्रेस : २९
अपक्ष : ००
इतर : ०८
बसप : ०२

सभांचा परिणाम
वरोरा येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या सभा झाल्या होत्या. अशोक चव्हाण यांचा प्रभाव सभास्थळी दिसून आला नाही. वरोऱ्याची जागा भाजपने बळकावली. एकूणच नेत्यांचा प्रभाव जिल्ह्यात दिसून आला आहे. गड राखले गेले आहेत.

सत्तेचे गणित

पालिका पूर्वी आता

बल्लारपूर काँग्रेस+ भाजप
मित्रपक्ष वरोरा काँग्रेस+ भाजप
मित्रपक्ष मूल भाजप भाजप
राजुरा काँग्रेस काँग्रेस

सिंदेवाहीत पहिला मान भाजपला

चंद्रपूर : नव्याने अस्तित्वात आलेल्या सिंदेवाही नगरपंचायत निवडणुकीत भाजपलाच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एकूण १७ प्रभागातून ८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. प्रथमच झालेल्या या नगरपंचायत निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये उत्साह होता. १७ जागांपैकी १६ जागा जिंकत येथे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *