facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / लाभार्थींच्या यादीवरून झेडपीमध्ये वादावादी

लाभार्थींच्या यादीवरून झेडपीमध्ये वादावादी

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत निवडलेले लाभार्थी बदलण्यावरून सोमवारी प्रभारी समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी आणि सभापती शीला चव्हाण यांच्या पतीमध्ये जोरदार वादावादी झाली. सकाळी अकरा वाजता हा प्रकार मडावी यांच्या दालनात घडला. कर्मचाऱ्यांनी तातडीने सीईओ मधुकर अर्दड यांच्याकडे धाव घेऊन हा प्रकार कानावर घातला, मात्र नियम डावलून काही करू नका, असे आदेश अर्दड यांनी दिल्याने प्रकरण शांत झाले.
समाजकल्याण विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेतून ऑइल इंजिन वाटप करण्याची योजना आहे. गंगापूर तालुक्यातील १५१ लाभार्थी यासाठी निवडले होते. एका इंजिनची किंमत १९ हजार ८४५ एवढी आहे. यादी समाजकल्याण समितीसमोर निश्चित झाली. ही योजना २०१५-१६ची होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या यादीतील काही नावे बदलावीत, अशी मागणी करत सभापती शीला चव्हाण, त्यांचे पती विजय चव्हाण आणि अन्य तीन जण सोमवारी सकाळी मडावी यांच्या दालनात झाले. मडावी यांनी यादीतील नावे बदलण्यास नकार दिला. त्यावरून चव्हाण आणि मडावी यांच्यात वादावादी झाली. तेथील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार सीईओ अर्दड यांना सांगितला. सभापती शीला चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
आम्ही सरकारी नोकर आहोत. यंत्रणेचे गुलाम नाहीत. याद्या पूर्वीच मंजूर झालेल्या असताना त्यात बदल कसा काय करणार? नियमानुसारच काम केले जाईल, असे समजाकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.

समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या दालनात वादावादी झाल्याचा प्रकार कर्मचाऱ्यांनी सांगितला. नियम डावलून कुठलाही निर्णय घेऊ नये, असे मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.’’
– मधुकरराजे अर्दड, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *