facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / विकास प्राधिकरणात इचलकरंजी, कागल हवे

विकास प्राधिकरणात इचलकरंजी, कागल हवे

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – कोल्हापूर विकास प्राधिकरणात इचलकरंजी, कागल, वडगावसह आसपासची गावे समाविष्ट करावीत. प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातंर्गत सुविधासाठी प्रचंड निधी उपलब्ध करावा, अशी सूचना महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्या सहीनिशी प्राधिकरण संदर्भातील सूचना आणि हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाला मंगळवारी (ता.२९) सादर केली जाईल.

हद्दवाढीऐवजी प्राधिकरण स्थापण्याचा पर्याय पुढे आल्यानंतर त्या अनुषंगाने सादर करावयाच्या सूचना, महापालिकेचे विविध प्रकल्प, शहर विकासाच्या योजना संदर्भात महापालिकेत सोमवारी बैठक झाली. या बैठकीत प्राधिकरणाचे स्वरूप, फायद्याविषयी चर्चा झाली. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मावळत्या महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, सभागृह नेता प्रविण केसरकर, शिक्षण समिती उपसभापती सुरेखा शहा, भाजप गटनेते विजय सुर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्यासह नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक झाली.

प्राधिकरण संदर्भातील सूचना आणि हरकती सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. यापूर्वी हद्दवाढ विरोधी कृती समितीने प्राधिकरणविषयक सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० नोव्हेंबरपर्यंत प्राप्त सूचना व हरकतीवर आधारित जिल्हाधिकारी अहवाल तयार करणार आहेत. जिल्हाधिकारी दोन आठवड्यात अहवाल राज्य सरकारकडे सादर करतील.

प्राधिकरणचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी महापालिकेने एक महिन्याची मुदतवाढ घेतली होती. प्रत्यक्ष सादरीकरणावेळी आयुक्त, उपायुक्त, प्रकल्प कार्यालयापासून नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी प्राधिकरणची कार्यकक्षा सांगण्यापलीकडे काही केले नाही. प्रशासनाचा अभ्यास कच्चा असल्याचे समोर आले.

प्राधिकरणच्या माध्यमातून शहराचा विकास अपेक्षित आहे. शहर विकासासाठी आवश्यक प्रकल्प आणि निधीची सांगड घालून प्रस्ताव करण्याच्या सूचना आहेत. महापालिकेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला जाईल.

– मुरलीधर जाधव, सभापती, स्थायी समिती

प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील विकासप्रकल्पांना गती मिळू शकते. शहरात पाच उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. प्राधिकरण स्थापताना त्यामध्ये इचलकरंजी, वडगाव, कागलसह आसपासच्या गावांचा समावेश करावा अशी सूचना स्थायी सभापतींच्या सहीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येणार आहे.

– पी. शिवशंकर, आयुक्त

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *