facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / शाळा जूनमध्ये;प्रवेश आताच

शाळा जूनमध्ये;प्रवेश आताच

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – नर्सरीचे प्रवेश एप्रिल-मे महिन्यानंतर शिक्षण विभागाच्या वेळापत्रकानुसारच देणे सुरू करावे, अशा सूचना असतानाही शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेशाच्या जाहिराती झळकवणे सुरू केले आहे. दरवर्षी गाजत असलेल्या प्रवेशप्रक्रियेच्या या मुद्द्यावर अद्यापही ठोस उपाय निघत नसल्याने पालकवर्ग नाहक या प्रक्रियेत भरडला जात आहे. नियमबाह्य प्रवेशप्रक्रिया राबविणाऱ्या या शाळांना कारवाईचीही भीती वाटत नसल्याने व्यवस्थेवर शंका उपस्थित केली जात आहे.

पूर्वप्राथमिक म्हणजेच नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये प्रवेश घ्यायचा म्हटला तरी पालकांना घाम फुटतो. अवाढव्य फी, कागदपत्रांसाठी करावी लागणारी धावपळ, रात्रंदिवस रांगांमध्ये उभे राहून प्रवेश मिळविण्याची धडपड अशा अनेक कारणांमुळे पाल्याचा प्रवेश शाळेत करणे हे पालकांना एका मोठ्या आव्हानासमान झाले आहे. त्यातच शाळांनी शासनाचे सर्व नियम, अटी धाब्यावर बसवलेले असताना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा, या चिंतेने पालकांना सध्या ग्रासले आहे. यंदाच्या वर्षीही अशीच परिस्थिती असून जून २०१७ साठी शाळांनी जाहिराती झळकवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीही प्रवेशप्रक्रियेची अशाच प्रकारे घाई शाळांनी केल्याची उदाहरणे असून विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होईपर्यंतचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागला होता. यंदाही त्याचप्रकारे प्रवेशप्रक्रिया राबविली जात असल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे. एकीकडे प्रवेश मिळेल की नाही याची चिंता तर दुसरीकडे शाळांची मुजोरी, नियमांची पायमल्ली करणारे प्रशासन या गर्तेत पालक अडकले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी प्रवेशांचे वेळापत्रक मिळत नाही तोपर्यंत प्रक्रिया सुरू न करण्याचे आवाहन शाळांना केले आहे.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *