facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / सहाही नगराध्यक्ष भाजपचेच

सहाही नगराध्यक्ष भाजपचेच

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – वर्धा जिल्ह्यतील सहाही नगरपालिकांच्या अध्यक्षपदावर भाजपने विजय मिळविला आहे. एकहाती सत्ता काबीज करीत भाजपने पहिल्यांदा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थात निर्विवाद यश प्राप्त केले आहे. आर्वीचा काँग्रेसचा अभेद्य गड ध्वस्त करीत नगरसेवकपदाच्या २३ही जागांवर विजय मिळविला आहे. भाजपने दिमाखदार विजयाची नोंद केली आहे.

वर्धा सहा नगरपालिका नगराध्यक्षपद निवडणुकीत प्राप्त झालेले हे यश भाजपला सुखावणारे ठरले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी या निवडणुकीत भूसपाट झाले आहे. वर्धा येथे मतदानाच्या दिवसांपर्यंत अपक्षांचा बोलबाला दिसून येत होता. नोटा रद्दचा निर्णय भाजपला अडथडा ठरेल असा प्रचार अप्रत्यक्षरित्या केला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार दोन महिन्यांपासून जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. वर्धा, पुलगाव आणि हिंगणघाट येथे घेतलेल्या सभांचा प्रभाव फळाला आला. त्यामुळे अतुल तराळे हे दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहे. राष्ट्रवादीला याचा मोठा धक्का मानला जात आहे. देवळी येथील निवडणूक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजू बकाने आणि खासदार रामदास तडस यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र खासदार आणि जिल्हाध्यक्ष याच्यातील समन्वयाचा अभाव दगा-फटका देऊ शकतो म्हणून पक्ष वरिष्ठांनी खासदारांना जणू देवळीत गेल्या महिनाभरापासून तळ ठोकायला भाग पडले. गृहकलह टळल्याने विजय सुकर झाला आहे. सुचिता मडावी यांनी विजय संपादन केला आहे. राष्ट्रवादीचा अलीकडल्या काळातील जिल्ह्यातील गड असलेल्या हिंगणघाट येथे विधानसभेपाठोपाठ भाजपने नगराध्यक्ष म्हणून प्रेम बसंतानी यांच्या रूपाने निवडून आणून अॅड. सुधीर कोठारी यांची सत्ता ध्वस्त केली आहे. येथेही ३८पैकी ३० जागांवर विजय प्राप्त करून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजप राष्ट्रवादी यांची सत्ता असणाऱ्या सिंदी (रेल्वे ) येथेही भाजपने संगीता शेंडे यांच्या रुपाने नगराध्यक्ष निवडून आणला. परंतु १७ पैकी त्यांचे आठ नगरसेवक निवडून येऊ शकले आहेत. पुलगाव येथे आमदार रणजित कांबळे यांच्या वर्चस्वावाला जबरदस्त तडाखा बसला आहे. नगर परिषदेवरील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम करीत येथेही भाजपने आठ जागांवर सरशी केली आहे.

आर्वीत नगराध्यक्ष,
नगरसेवक भाजपचेच

आर्वी नगरपालिकेत भाजपने एकहात्ती सत्ता काबीय करीत काँग्रेसच्या बालेकिल्ला हादरविला आहे. केवळ नगराध्यक्षपदच नव्हे तर नगरसेवकपदाच्या २२ही जागांवर विजय मिळविला आहे. यापूर्वी येथे भाजपची सत्ता होती. १३ भाजप आणि दहा काँग्रेसचे नगरसेवक होते. २००९मध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघातून दादाराव केचे यांनी भाजपचे प्रतिनिधीत्व संधी देऊन भाजपने खाते उघडले होते. २०१४मध्ये अमर काळे यांच्या माध्यमातून काँग्रेसने पुन्हा एकदा ताबा मिळविला. त्यानंतरही केचे यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला होता. त्याचा परिणाम म्हणून आता आर्वी काँग्रेसमुक्त झाले आहे. आमदार काळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नगराध्यक्ष कुणाचे किती?

भाजप : ०६
राष्ट्रवादी : ००
शिवसेना : ००
एकूण : ०६

नगरसेवक कुणाचे किती?

भाजप : १०४
काँग्रेस : १९
राष्ट्रवादी : १०
सीपीआयएम : ०१
शिवसेना : ०१
अपक्ष : ०७
रिपाइं (आ) : ०२
बसप : ०५

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *