facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / २१ हजार नागरिकांच्या दारी पोहोचला ‘न्याय’

२१ हजार नागरिकांच्या दारी पोहोचला ‘न्याय’

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – विधी सेवा प्राधिकरणने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २४ व २५ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये ‘न्याय आपल्या दारी’ ही योजना राबवली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २१ हजार १२२ नागरिकांना स्वयंसेवकांमार्फत न्यायविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत न्याय पोहोचण्यासाठी न्याय यंत्रणाच गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. न्याय आपल्या दारी या योजनेअंतर्गत विधी सेवा प्राधिकरणने शहरासह जिल्ह्यात घरोघरी जाऊन समाजातील दुर्बल घटकांना न्यायविषयक मार्गदर्शन केले.

यासाठी अर्चना पांढरे, दीपाली काटकर, अनिता काळे, शामराव पाटील, सुषमा बटकडली, प्रसाद जाधव आदींसह स्वयंसेवी संस्थांनी परिश्रम घेतले. जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर स्वयंसेवकांनी ओळखपत्र आणि धनादेशांचे वाटपही करण्यात आले. न्याय आपल्या दारी ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी विशेष नियोजन केले.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *