facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / उमाळ्यात दोन गटात दंगल; २२ जणांविरुद्ध गुन्हे
aawaz-news-image

उमाळ्यात दोन गटात दंगल; २२ जणांविरुद्ध गुन्हे

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – घराजवळ कचरा टाकल्यावरून जळगाव तालुक्यात उमाळ्यात दोन गटात दंगल उसळली. यात १० जण जखमी झाले. तर एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये दोन गटांतील २२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी (दि. २८) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उमाळा येथे संदेश खैरनार यांची आई पुष्पाबाई यांनी घराजवळ प्रताप शिवाजी उचाळे यांना उकिरडा टाकल्याने जाब विचारला. त्यानंतर उचाळे याने पुष्पाबाईंना शिवीगाळ केली. उचाळेसोबत वसंत सुपडू पाटील, ज्ञानेश्वर अमृत पाटील, नीळकंठ वसंत पाटील यांनी शिवीगाळ केली. आपल्या आईला शिवीगाळ करत असल्याबद्दल संदेशने त्या तिघांना जाब विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी संदेशला मारहाण केली. संदेशने वडिल भगवान खैरनार, आईचे वडिल पंढरी किसन जाधव, मामा शिवाजी जाधव, मामाचा मुलगा भूषण शिवाजी जाधव, अकुंश खैरनार यांना संदेशने बोलावून घेतले. यावेळी उचाळे आणि खैरनार या दोन गटांमध्ये हाणामारी झाली.

लाकडी दांडके, लोखंडी सळई, लोखंड फावडे घेवून एकमेकांवर मारहाण करण्यात आली. यात कोणाच्या डोकं फुटले तर कुणाचे हात मोडले गेले. एकाच्या डोळ्यांवर गंभीर इजा झाली. दोन गटांतील दहा जण जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. स.पो.नि. समाधान पाटील, दिनकर खैरनार, भरत लिंगायत यांनी रुग्णालयात जखमींचे जबाब घेतले. दोन्ही गटांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *