facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / छत्रपतींचा आशीर्वाद, जनतेचा विश्वास
news-4

छत्रपतींचा आशीर्वाद, जनतेचा विश्वास

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद आणि केंद्र व राज्य सरकारच्या विकास कामांवर जनतेने दाखविलेला सार्थ विश्वास यामुळेच नगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय आम्ही संपादन करू शकलो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

राज्यासमोर अनेक आव्हाने होती. पण, त्याची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या योजना आखते आहे, त्यावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार सुद्धा गरिब आणि मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना राबवित आहे. त्यावर सुद्धा मतदारांनी भरभरून यश दिले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्रिमंडळातील सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ४० ठिकाणी प्रचारसभा झाल्या, त्यातील ३३ नगरपरिषदेत भाजपला यश मिळाले आहे.

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *