facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / पुणे-नागपूर व्होल्वो रविवारपासून सुरू
news-6

पुणे-नागपूर व्होल्वो रविवारपासून सुरू

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या चार डिसेंबरपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पुणे-नागपूर व्होल्वो बस सेवा सुरू होणार आहे. ही बस अकोला आणि अमरावती येथेही थांबणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
ही गाडी रविवारी सायंकाळी सात वाजता शिवाजीनगर आगारातून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता नागपूरला पोहचेल. नागपूरहून पुन्हा तीच गाडी सायंकाळी सात वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पुण्यात दाखल होईल. गाडीचे तिकीट ऑनलाइन आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून आरक्षित करता येणार आहेत. तसेच, आगाऊ बुकिंगसाठी स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना या आगारांवरही तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *