facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / ‘महावितरण’ने तोडली पथदिव्यांची वीज
news-17

‘महावितरण’ने तोडली पथदिव्यांची वीज

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – महापालिकेकडे पथदिव्यांच्या वीजबिलाची ८ कोटी रुपयांची रक्कम थकल्याने महावितरणने सोमवारी सायंकाळी शहरातील सर्व पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडला. यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य होते. मनपाकडे पाणी योजनेच्या चालू वीजबिलाचेही २६ कोटी रुपये थकले असल्याने मंगळवारी (२९ नोव्हेंबर) या योजनेचीही वीज तोडण्याची तयारी महावितरणने सुरू केली आहे.यांनी यासंदर्भात ‘मटा’शी बोलताना सांगितले, मार्च-एप्रिलमध्ये पथदिव्यांच्या थकित वीजबिलापोटी ५० लाख रुपये मनपाने दिले होते. त्याच वेळी साडेचार कोटीची थकबाकी होती. ती आता वाढत जाऊन आठ कोटी झाली आहे. वसुलीसाठी मनपात गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तेथे फक्त बसवून ठेवले जाते. आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही पैसे भरले जात नसल्याने शहरातील सर्व पथदिव्यांची वीज तोडण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी सायंकाळी त्याची अंमलबजावणीही झाली आहे. दरम्यान, पाणी योजनेला केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याच्या वीजबिलाची १४० कोटींची थकबाकी आहे. यातील ११४ कोटींच्या थकबाकीबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मनपामध्ये जुने वाद असले तरी चालू बिलाचेही २६ कोटी थकले असल्याने या योजनेचा वीजपुरवठा मंगळवारी तोडला जाणार आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

Check Also

fadnavis

मराठा आरक्षण देणारच : देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‌विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *