facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / रुग्णालय जागेवर पे अँड पार्क
news-16

रुग्णालय जागेवर पे अँड पार्क

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – महापालिका मालकीच्या साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेवर पे अँड पार्क सुरू करण्यासाठी महापालिकेच्या शनिवारी, ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत निर्णय घेतला जाणार आहे. याबरोबरच महासभेच्या विषयपत्रिकेवरील अन्य १५ विषयांवरही चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

आचारसंहितेमुळे गेल्या महिन्यापासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या महासभेला अखेर मुहूर्त गवसला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. या महासभेत तेराव्या वित्त आयोगातून महापालिका हद्दीतील संपूर्ण मालमत्तांचे जी. आय. एस. प्रणालीद्वारे सर्वेक्षण करणे, मालमत्तांचे सगंणकीकृत कर निर्धारण आणि कर आकारणी करण्याबाबत प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे.

महापालिकेच्या गाळ्यांच्या हस्तांतरण शुल्काला मान्यता दिली जाणार आहे. जळगाव शहरात पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने जुन्या साने गुरुजी रुग्णलयाची जागा मोकळी झाल्याने त्या ठिकाणी पे अँड पार्कची सुविधा सुरू करण्याचा नितीन बरडे यांच्या प्रस्तावावरही चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जळगाव जनता बँकेचे चेअरमन प्राचार्य अनिल राव, व उद्योगपती भरत अंमळकर यांना ब्रँण्ड अ‍ॅम्बेसेडर नियुक्त करण्याबाबत भाजपाचे गटनेते सुनील माळी यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *