facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / ऑरिकमधील प्लॉटसाठी ८७१ जणांची नोंदणी

ऑरिकमधील प्लॉटसाठी ८७१ जणांची नोंदणी

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये (ऑरिक) पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शेंद्रा परिसरातील ऑरिक सिटीमध्ये ४३ एकरांतील ४९ भूखंडांची विक्री करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. ऑनलाइन पद्धतीने या भूखंडांची विक्री होणार असून, दुसऱ्या दिवशीपर्यंत ८७१ जणांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भूखंडांचा निश्चित केलेला दर पाहता औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी लिमिटेडला (एआयटीएल) ५५ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
दहा हजार एकर जमीन यासाठी संपादित केली गेली आहे. शापूर्जी पालंजी या कंपनीतर्फे पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑरिक हॉलच्या भूमिपूजनप्रसंगी २८ नोव्हेंबरपासून भूखंड वाटप प्रक्रिया ऑनलाइन सुरू केली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारपासून प्रक्रियेस सुरवात झाली. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती उपलब्ध आहे. ती मिळविण्यासाठी इच्छुकांना वेबसाईटवर जाऊन ई-मेल आयडी द्यावा लागणार आहे. दोन दिवसांत ८७१ जणांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. ३२०० रुपये चौरसमीटर असा दर भूखंडविक्रीसाठी निश्चित केला असून ४३ एकरावरील ४९ प्लॉटच्या विक्रीतून ५५ कोटी रुपये जमा होतील, अशी अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *