facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / टेम्पोची बाइकला धडक; २ पोलीस गंभीर

टेम्पोची बाइकला धडक; २ पोलीस गंभीर

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला येथे मंगळवारी रात्री उशिरा एका भरधाव टेम्पोने गस्तीवरील पोलिसांच्या बाइकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही पोलिसांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे दोन्ही पोलीस कर्मचारी बाइकने गस्त घालत असतानाच भरधाव टेम्पोने त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही पोलीस बाइकवरून फेकले गेले. या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जखमी पोलिसांची नावे कळू शकली नाहीत.
दरम्यान, या अपघाताप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली असून टेम्पोही जप्त करण्यात आला आहे.

एक्स्प्रेस वे-वर ट्रक उलटून चालक ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर खोपोलीजवळ आज ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे या मार्गावर सकाळीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *