facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / तीस हजारांचा गुटखा जप्त

तीस हजारांचा गुटखा जप्त

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – जिल्ह्यातील गुटखा तस्करी आणि खुलेआम विक्रीचे वास्तव ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दाखवल्यानंतर अन्न व औषध प्रशासनला जाग आली आहे. विभागाने मंगळवारी (ता. २९) हातकणंगले परिसरात पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे ३० हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त केली. तर सप्टेंबर महिन्यात कारवाई केलेल्या गुटखा कारखान्यातील चार आरोपींवर जयसिंगपूर कोर्टात फौजदारी गुन्हा दाखल केला.

सीमाभागातून जिल्ह्यात होणारी गुटख्याची तस्करी आणि खुलेआम विक्री याची वस्तुस्थिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडली होती. या वृत्ताची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनने मंगळवारी हातकणंगले आणि तारदाळ येथे पाच ठिकाणी छापे टाकून करवाई केली. हातकणंगले येथे पोलिस ठाण्याच्यासमोर बाबू पानशॉपमध्ये छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना १८ हजार ५०० रुपयांचा गुटखा आणि पानमसाला मिळाला. तारदाळ येथील महालक्ष्मी किराणा अँड बेकर्स या दुकानात केलेल्या कारवाईत १० हजार रुपयांचा गुटखा आणि पानमसाला मिळाला. सिकंदर मोबाइल रिचार्ज या दुकानात १५०० रुपयांचा गुटखा मिळाला. अधिकाऱ्यांनी यासह आणखी दोन दुकानांमध्ये कारवाई करून सुमारे ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तीन दुकानदारांकडे व्यवसाय परवानेही नाहीत.

अधिकाऱ्यांनी मुद्देमाल जप्त केला असून, दुकानदारांना नोटिसाही दिल्या आहेत. सहायक आयुक्त (अन्न) सुकुमार चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक कोळी, बिभीषण मुळे आदींनी ही कारवाई केली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *