facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / नोटाबंदीमुळे भाजप जिंकला म्हणणारे मूर्ख!

नोटाबंदीमुळे भाजप जिंकला म्हणणारे मूर्ख!

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – ‘काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ‘एमआयएम’सारख्या पक्षांशी ‘छुपे गटबंधन’ केले असते तर आमच्याही नगराध्यक्षांचा आकडा ‘सुजला’ असता. ‘नोटाबंदी’च्या निर्णयाने खूश होऊन जनतेने भाजपचे ५० नगराध्यक्ष निवडून दिले असे सांगणारे मूर्ख आहेत. तसे असते तर भाजपचे किमान शंभर नगराध्यक्ष निवडून आले असते’, अशा शब्दांत शिवसेनेने नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयावर तोफ डागली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून नगर परिषद निवडणुकांच्या निकालावर कटाक्ष टाकताना शिवसेनेचा विजय पवित्र आणि निर्मळ असल्याचे म्हटले आहे. भाजपला या निवडणुकांत मिळालेल्या विजयाचा आम्ही सन्मान करतो पण त्यांचा फुगलेला आकडा ही तात्पुरती सूज ठरू नये, असा चिमटाही उद्धव यांनी काढला आहे.
ज्यांच्यावर वरच्या पातळीवर भ्रष्टाचाराचे, राजकीय व्यभिचाराचे आरोप करायचे, त्यांना तुरुंगात पाठवायचे, याच मंडळींनी महाराष्ट्राची कशी वाट लावली असे जाहीर सभांतून बोलायचे व त्याच लोकांशी खाली अभद्र युत्या व तडजोडी करून कार्यकर्त्यांचा अवसानघात करायचा हे धोरण आम्ही राबवले नाही, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

भारतीय जनता पक्षाचे अनेक बालेकिल्ले पडले आहेत. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांना धक्के बसले आहेत. मालवणात नारायण राणे तर कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना हादरे बसले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना बसलेले फटके हेच राज्याचे जनमानस आहे, असे विश्लेषणही या अग्रलेखात करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पन्नासच्या वर सभा घेतल्या. तरीही भाजपला मिळालेले यश मर्यादित आहे व विदर्भाने पाठबळ दिल्याने आजचा आकडा दिसत आहे, असेही उद्धव यांनी नमूद केले.

‘त्या’ आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!

निवडणूक खर्चाकरिता निवडून येऊ शकतील अशा उमेदवारांना पक्षाकडून निधी देण्यात आला होता. त्याची काही रक्कम जुन्या नोटांच्या माध्यमातून पालिकांमध्ये भरण्यात आली. त्याचा भाजपला फायदा झाला. भाजपच्या मतदारांना करमुक्त करण्याच्या मोहिमेवर अनेकांनी बोट दाखवले होते. पण शेवटी व्हायचे ते झालेच. असे जे आरोप सुरू आहेत त्यावर आता मुख्यमंत्र्यांनाच उत्तर द्यावे लागेल, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *