facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / पुरुषोत्तम करंडकाच्या तयारीला वेग

पुरुषोत्तम करंडकाच्या तयारीला वेग

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – येत्या ३ ते ४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी मंगळवार, (दि. २९) रोजी एम. जे. कॉलेजमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत कॉलेजमध्ये केसीईचे सभासद शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी, उपप्राचार्य नंदकुमार भारंबे यांच्यासोबत स्पर्धा नियोजन मंडळाची बैठक झाली.

याप्रसंगी आयोजन समित्यांमधील समित्यांचे प्रमुख आणि समित्यांमधील सहभागी ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित होते. येणाऱ्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना या स्पर्धेत मनोरंजनासोबत सादरीकरण आणि त्यासाठीची शिस्त आणि आयोजनाचा आदर्श उदाहरण पाहायला मिळणार आहे.

याप्रसंगी डॉ. हेमंत पाटील यांनी पुरुषोत्तम करंडकाच्या आयोजनाविषयी भूमिका स्पष्ट केली. या स्पर्धेकरीता १४ प्रकारच्या समित्यांची स्थापना करण्यात आली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ४ डिसेंबरला गंधे सभागृहात पार पडणार आहे. वितरणाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सिनेअभिनेत्री प्रतिक्षा लोणकर येणार आहे. लोणकर या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतूनच घडलेल्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनातून नाटकाकडे पाहण्याची दृष्टी नाट्यकर्मीं विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *