facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / बेस्टच्या मार्गात उद्यापासून बदल

बेस्टच्या मार्गात उद्यापासून बदल

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – बेस्टने गुरुवार, १ डिसेंबरपासून मुंबईतील विविध मार्गांवर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यांत नवीन बसमार्ग, सर्वसाधारण मार्गावर अंशतः तर जलद मार्गांसह अन्य काही मार्गांवर बदल करण्यात येणार आहेत. ज्या मार्गांवर प्रवाशांचा कमी प्रतिसाद आहे, त्यावरील फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी बेस्ट प्रशासनाने तोट्यातील काही फेऱ्या रद्द करण्याचे राजकीय पडसाद उमटले होते. त्यावेळी, शिवसेनेसह काँग्रेसनेही त्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर बेस्टने फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला होता.

* नवीन मार्ग

एसी बसमार्ग क्र. ए-७० जलद (मंत्रालय ते मीरा रोड स्टेशन ),

एसी क्र.एएस-४५८

(मुलुंड डेपो ते प्रबोधनकार ठाकरे नगर),

एसी मार्ग क्र.एएस ५०३ (वडाळा डेपो-कळंबोली)

क्र.एएस ४५८(मुलुंड डेपो ते प्रबोधनकार ठाकरेनगर बसस्टेशन दरम्यान घोडबंदर रोड-ठाणे आणि दहिसर मार्गे),

एसी क्र.एएस ५०३ (वडाळा डेपो-कळंबोलीपर्यंत राणी लक्ष्मीबाई चौक-सायन, देवनार डेपो, सीबीडी बेलापूर जं. मार्गे)

* फेऱ्या रद्द

एसी क्र. एएस ७१ मच्छिमारनगर माहीम ते मीरारोड स्टेशन (पू.), एसी क्र. एएस ५१४ मुलुंड बस ते माइंड स्पेस, ऐरोली या सेवांना प्रतिसाद नसल्यामुळे ही सेवा रद्द

कॉरिडॉर मार्ग क्र.६ जलद इलेक्ट्रिक हाऊस- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (चेंबूर) पर्यंत पूर्वमुक्त मार्गावरून जाणाऱ्या बसचे डॉ. मुखर्जी चौक व इलेक्ट्रिक हाउसपर्यंत फेरी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी ही फेरी डॉ. मुखर्जी चौक येथून मादाम कामामार्गे मंत्रालयापर्यत जाईल. यापुढे ही बससेवा मंत्रालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (चेंबूर) पर्यंत पूर्व मुक्त मार्गे सकाळ-सायंकाळी चालविण्यात येणार आहे.

* काही मार्गात बदल

>> कॉरीडार बसमार्ग क्र. ६ ही जलद बससेवा इलेक्ट्रिक हाउस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (चेंबूर) पर्यंत जाणाऱ्या बसचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक व इलेक्ट्रीक हाउसपर्यंतचा मार्ग रद्द. ही बस मुखर्जी चौक येथून मादाम कामा मार्गे मंत्रालयापर्यंत.

>> नवीन बदलानुसार ही फेरी मंत्रालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (चेंबूर) पर्यंत पूर्व मुक्तमार्गे सकाळ-सायंकाळी चालवली जाईल.

>> एसी क्र.एएस ७०० बोरीवली (पू.) ते ठाणे स्टेशन (पू.) हा बसमार्ग यापुढे मुलुंड डेपो ते बोरीवली स्टेशन (पू.) पर्यंत.

>> एसी क्र.एएस ७०७ सातबंगला बसस्टेशन ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, भाईंदर(पू.) हा मार्ग यापुढे सांताक्रूझ डेपो ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, भाईंदर(पू.) पर्यंत चालेल.

>> एसी बसमार्ग क्र.एएस-२ नेहरू तारांगण ते मीरारोड स्टेशन (पू.) हा मार्ग यापुढे दहिसर चेकनाका ते मीरा रोड स्टेशन (पू.) पर्यंत.

>> वाहतूक पोलिसांनी प्रियदर्शिनी चौक येथील वाहतूक नियमनात बदल केल्यामुळे क्र. ५८, क्र. ५९, क्र. ६०, क्र. ८५, क्र ३५५, क्र. ३५७, क्र. ३९३, क्र. ४५७ या मार्गांमध्येही बदल.

* केवळ रविवारी बंद

बस क्र. ४५६ ही शिवशाही प्रकल्प ते मालवणी डेपो,

बस क्र. ४८५ ची घाटकोपर ते मालाड डेपो आणि एएस ७२ ही राणी लक्ष्मीबाई चौक ते स्वा. सावरकर चौकापर्यंत धावणाऱ्या बसेस फक्त रविवारी बंद.

* विस्तारित फेऱ्या

क्र.एएस ४५८ (मुलुंड डेपो ते प्रबोधनकार ठाकरेनगर बसस्टेशन दरम्यान घोडबंदर रोड-ठाणे आणि दहिसर मार्गे),

एसी क्र.एएस ५०३ (वडाळा डेपो-कळंबोलीपर्यंत राणी लक्ष्मीबाई चौक-सायन, देवनार डेपो, सीबीडी बेलापूर जं. मार्गे) हे नवीन मार्ग सुरू केले आहेत.

क्र.एएस ५ वांद्रे (पू.) बसस्टेशन आणि कॅडबरी जं.-ठाण्यापर्यंत चालविण्यात येणारी बस कॅडबरी जं. येथून घोडबंदर मार्गावरॅन हिरानंदानी इस्टेट-ठाण्यापर्यंत विस्तारित केली आहे. एसी क्र.एएस ४२२ मुलुंड(प.) चेकनाका आणि आगारकर चौक, अंधेरी(पू.) फेरीचा विस्तार मुलुंड (प.) येथून कॅडबरी जं.-ठाण्यापर्यंत विस्तार केला आहे.

एसी मार्ग क्र. एएस-५ वांद्रे(पू.) बसस्टँड आणि कॅडबरी जंक्शन सेवा घोडबंदरहून हिरानंदानी इस्टेट-ठाणेपर्यंत.

एसी बस क्र.एएस ४२२ मुलुंड(प.) चेकनाका-आगारकर चौक, अंधेरी (पू.) सेवेचा विस्तार कॅडबरी जंक्शन-ठाणेपर्यंत.

एसी क्र.एएस ७०० बोरीवली (पू.) ते ठाणे (पू.) हा मार्ग यापुढे मुलुंड डेपो ते बोरीवली (पू.), क्र.एएस ७०७ सात बंगला ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक भाईंदर (पू.) हा मार्ग यापुढे सांताक्रूझ डेपो ते भाईंदर (पू.) पर्यंत चालेल.

एसी क्र.एएस २ नेहरु तारांगण ते मीरा रोड (पू.) हा मार्ग यापुढे दहिसर चेकनाका ते मीरारोड (पू.)

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *