facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / मद्यपीचा तहसील कार्यालयात गोंधळ

मद्यपीचा तहसील कार्यालयात गोंधळ

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – तीन दिवसापूर्वी डंपर पकडल्याच्या रागातून मंगळवारी (दि. २९) सायंकाळी साडेपाच वाजता मद्यधुंद डंपरमालकाने तहसील कार्यालयात गोंधळ घातला. यासोबतच त्याने तहसीलदारांच्या वाहनचालकास धक्काबुक्की केल्याने याठिकाणी गर्दी झाली होती.

तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्याचा दम दिल्यानंतर त्या मद्यधुंद डंपरमालकाने कार्यालयातून काढता पाय घेतला.भूषण रघुनाथ कोळी या वाळू व्यावसायिकाचे दोन डंपर खेडी शिवार तसेच नशिराबाद येथून तहसीलदार अमोल निकम व निवासी नायब तहसीलदार डी. एस. भालेराव यांच्या पथकाने पकडले होते. मंगळवारी डंपरमालक भूषण मद्यधुंद अवस्थेत तहसील कार्यालयात डंपर सोडून द्यावे, यासाठी आला होता. त्याने, तहसीलदार अमोल निकम यांच्या वाहनावरील चालक सचिन पाटील यांना तुम्हीच वाहन पडकले म्हणून वाद घातला. दोघांमध्ये बाचाबाची होऊन डंपरमालकाने धक्काबुक्की केली.

मोबाइल लांबविला

नवीपेठ परिसरातील इलेक्ट्रिक दुकानासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातातून भरधाव वेगाने आलेल्या दोघंही मोटार सायकलस्वारांनी मोबाइल हिसकावून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. श्रीराम यशवंत पाटील (रा. कोल्हेनगर) यांचा २१,९०० रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *