facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / मिहानला हवी स्वस्त वीज

मिहानला हवी स्वस्त वीज

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – मिहान-सेझमधील उद्योजकांना ४.३९ रुपये प्रती युनिट दराने वीज दिली जात आहे. पण, सध्या खुल्या बाजारातून खरेदी होणारी ही वीज मिहानला न परवडणारी झाली आहे. यासाठीच आता स्वस्त वीजपुरवठ्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
मिहान-सेझ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ४३०० हेक्टरचा आहे. या प्रकल्पांत ६५ कंपन्यांनी ज‌ागा घेतली असली तरी अद्याप २५ टक्केच कंपन्या आल्या आहेत. २००२ ला सुरू झालेला प्रकल्प आतापर्यंत पूर्ण जोमाने उभा झाला असता तर किमान २०० मेगावॉट विजेची गरज रोज भासली असती. हे पाहूनच एमएडीसीच्या सहकार्याने अभिजित ग्रूपने तब्बल २५६ मेगावॉटचा विशेष वीज प्रकल्प उभा केला. पण, अनेक तांत्रिक अडथळ्यांमुळे तसेच प्रकल्पात कंपन्यांनी कामे सुरू न केल्याने हा प्रकल्प अव्यवहार्य ठरून पूर्णपणे तोट्यात गेला. या सर्व धामधुमीत सध्या कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या युनिट्सना आश्वासित केल्याप्रमाणे २.९६ रुपये प्रती युनिट दराने वीज मिळू शकली नाही. अखेर २०१४ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर नवीन सरकारने विजेचा प्रश्न मार्गी लावत कंपन्यांसाठी ४.४० रुपये दर निश्चित केला. मिहान-सेझला विकसित करणारी एमएडीसी सध्या या दराने वीज देत आहे. पण, त्यासाठी एमएडीसी खुल्या बाजारातून वीज घेत आहे. ही वीज महाग पडत असल्याने आता स्वस्त विजेचा पर्याय शोधला जात आहे. खुल्या बाजारातून वीज घेण्यासंबंधीचे कंत्राट डिसेंबरमध्ये रद्द होत आहे. त्यातच खुल्या बाजारातील वीज व सध्याची मागणी आणि आता त्यावर लावला जाणारा अधिभार, यामुळे कसाबसा ‘ना नफा ना तोटा’ दर गाठता येत आहे. यासाठीच स्वस्तात स्वस्त दरात वीज मिळ‌विण्यासाठी निविदा काढण्यात आली असल्याचे एमएडीसीतील उच्चाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एमएडीसीने काढलेल्या निविदेनुसार, सध्या मागणी असलेली रोज सात ते साडे तास मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यासाठी कंपनीला निमंत्रित करण्यात आले आहे. या कंपनीने सहा महिन्यांसाठी निश्चित दराने वीज द्यावी, असे निविदेत नमूद आहे. निविदा भरण्याची अखेरची तारीख १६ डिसेंबर आहे.

–अद्यापही मागणी नाहीच!
मिहान-सेझ प्रकल्पात २०० मेगावॉटपर्यंत विजेची मागणी अपेक्षित होती. पण प्रकल्प माघारला, हे निश्चित. त्यानंतर आता मागील दोन वर्षांत बरीच कामे झाली. त्यात एमआरओ, टीसीएस आणि टालचे युनिटही जोमाने सुरू झाले. हे पकडून किमान ३२ मेगावॉट रोजची मागणी असेल, अशी अपेक्षा होती. पण एवढ्या मोठ्या प्रकल्पातून अद्यापही ७ ते साडेसात मेगावॉटपेक्षा अधिक विजेची मागणी नसल्याचे नकारात्मक वास्तव आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *