facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / सेनेचे कमबॅक; भाजप अस्वस्थ

सेनेचे कमबॅक; भाजप अस्वस्थ

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – नगरपालिका निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपऐवजी शिवसेनेला झुकते माप दिल्याने महापालिका निवडणुकांमध्येही हाच कल कायम राहील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता तर वाढली आहेच शिवाय जे मनसेतून भाजपमध्ये आले आहेत त्यांची तर झोप उडाली आहे.

जिल्हा परिषद आणि महापालिकेतही हा ट्रेंड कायम राहिला तर प्रवेशकर्त्यांची अडचण होणार असल्याने त्यांनी आता प्रवेशाच्या निर्णयावर फेरविचार सुरू केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी युती नकोच अशी भूम‌िका घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात सेना भाजपतील शीतयुद्ध अधिक पेटणार आहे. सहा नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेने चांगले यश संपादन केले असून, चार नगराध्यक्षासह चार पालिकाही पूर्ण क्षमतेने ताब्यात घेतल्यात. जिल्हापरिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शिवसेनेला संजीवनी देणारा आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, भाजपकडून सत्तेत दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीचा वचपा काढण्याची संधी मिळाली आहे. सेनेची ताकद वाढली असली, तरी दुसरीकडे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या निकालांमुळे साहजिकच महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडे इनकमिंग वाढणार आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर मतदारांनी विश्वास दाखवलेला नाही. विश‌िष्ठ पदाधिकारीच भाजपमध्ये निर्णय घेतात, त्यामुळे भाजपचा विस्तार होण्याऐवजी नुकसान होत असल्याचा सूर आता व्यक्त केला जात आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *