facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / आठ डिसेंबरला महापौर निवड
news-15

आठ डिसेंबरला महापौर निवड

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आठ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीने निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवा रंग भरणार आहे. सत्तारुढ काँग्रेस आघाडीतील सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महापौरपद तर काँग्रेसकडे उपमहापौरपद जाणार आहे.

वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्याने अश्विनी रामाणे यांनी २५ नोव्हेंबर रोजी पदाचा राजीनामा दिला. प्रशासनाने, त्याच दिवशी विभागीय आयुक्तांकडे दोन्ही पदांच्या राजीनाम्याची माहिती दिली. नवीन महापौर निवडीचा कार्यक्रम मागविलाही होता. विभागीय आयुक्तांकडून महापौर व उपमहापौरपदासाठी आठ डिसेंबर रोजी निवडणुकीची तारीख निश्चित केली आहे. या दोन्ही पदासाठी तीन डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

सहा महिन्यांचेच पद

महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका हसीना फरास, अनुराधा खेडकर आणि माधवी गवंडी शर्यतीत आहेत. यात फरास यांचे नाव आघाडीवर आहे. महापालिका निवडणुकीवेळीच नेत्यांनी फरास यांना पद देण्याचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे गेल्या सभागृहात तत्कालीन नगरसेवक प्रकाश गवंडी यांना पद मिळाले नव्हते. नव्या सभागृहात त्यांच्या पत्नी माधवी प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्याकडूनही पदासाठी दावा केला जात आहे. लक्षतीर्थ वसाहत प्रभागाच्या नगरसेविका अनुराधा खेडकर यांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने वर्षभरात दोघांना संधी दिली जाईल अशी नगरसेवकांत चर्चा आहे. तसे झाल्यास सहा महिन्यांचे दोन महापौर होतील. या आठवड्यात राष्ट्रवादीची बैठक होईल. त्यात आमदार हसन मुश्रीफ हे अंतिम निर्णय घेतील.

भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीमार्फत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढविली जाईल. नेत्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे उमेदवार ठरतील. मात्र आम्ही ही निवडणूक लढविणार हे नक्की आहे.

– सुनील कदम, ताराराणी आघाडीचे नेते

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *