facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / नॉर्वेच्या सायकल‌िस्ट पिता-पुत्राची विश्वभ्रमंती
aawaz-news-image

नॉर्वेच्या सायकल‌िस्ट पिता-पुत्राची विश्वभ्रमंती

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – बर्जेन (नॉर्वे) ते मुंबई अशा सायकल भ्रमंतीवर निघालेल्या रोनाल्ड आणि म्युरीस डेकर या पिता-पुत्राने नाशिकचा पाहुणचार घेतला. बर्जेन ते मुंबईकडे कूच करत असलेले हे पिता-पुत्र सापुताऱ्याहून नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी नाशिक सायकल‌िस्ट आणि गुरू गोविंदसिंग फाउंडेशन या संस्थांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरु गोविंदसिंग फाउंडेशनचे एस गुरुदेव सिंग विर्दी आणि नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि स्वागतपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

नॉर्वे या देशातून आलेल्या या जोडीने आत्तापर्यंत युरोप, इराण मस्कॅट असा प्रवास केला. मस्कॅट येथून त्यांनी अहमदाबाद येथपर्यंत विमानाने प्रवास केला. भारतातील त्यांचा प्रवास अहमदाबाद, गांधीनगर, बडोदा, सापुतारा, नाशिक आणि नंतर मुंबई असा झाला. त्यांची ही मोहीम शेवटच्या टप्यात आली आहे. नाशिक सायकल‌िस्टचे अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांच्या विशेष विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या मार्गात नाशिकचा समावेश केला.

सोमवारी रात्री नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर मंगळवारी सकाळी ६ वाजता रोनाल्ड आणि म्युरीस यांच्यासाठी स्पेशल राईडचे आयोजन केले. नाशिक सायकलिस्टच्या संघाने त्यांच्यासोबत सिटी सेंटर मॉल ते गुरू गोविंदसिंग कॉलेज असा सायकल प्रवास केला. नाशिक येथील स्वागत समारंभात या पिता-पुत्रांने त्यांचे भारतातील अनेक विलक्षण अनुभव सांगितले. एखादा रस्ता कुठे जातो त्यापेक्षा या प्रवासातील निसर्ग आणि जगाचे ज्ञान मिळविण्यात परमानंद असल्याचा संदेश घेऊन ही मोहीम करण्याचे ठरविल्याचे माहिती ५५ वर्षीय रोनाल्ड यांनी दिली. भारतात आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी झालेल्या स्वागताने भारावून गेल्याचे रोनाल्ड म्हणाले.

नोटबंदीचा फटका अन् कौतुकही

भारतीय लोक, भारतीय संस्कृती आणि ‘इनक्रेडिबल इंडिया’ ही भारताची उद्घोषणा भारताला अगदी साजेशी असल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे त्यांनाही एटीएमच्या लाइनमध्ये उभे राहावे लागल्याचे त्यांनी सांगितले मात्र या निर्णयाचे कौतुकही केले. आपल्या देशातील स्वच्छ भारत अभियानातही त्यांनी सहभाग नोंदविला. भारतातील अनेक अनुभव त्यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे. समारंभ संपल्यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *