facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच
news-16

मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने रेबीज लसीकरण व नसबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वर्ष उलटूनही यांस मुहूर्त मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या दोन आठवड्यात शहर व तालुक्यात दहाजण कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.

शहरातील सर्वच भागांमध्ये मोकाट श्वानांच्या टोळक्यांचा धुमाकूळ सुरू आहे. या श्वानांकडून होणारे हल्ले वाढले आहे. मागील आठवड्यात सोमवारी, एकाच दिवशी जिल्ह्यात १६ जणांचे लचके या मोकाट कुत्र्यांनी तोडले आहेत. डॉग व्हॅनद्वारे मोकाट कुत्र्यांना पकडून शहराबोहर सोडून देण्याची कारवाईदेखील थांबविण्यात आली आहे.

तरतूद केवळ कागदावर

महापालिकेने या कुत्र्यांना लसीकरण व निर्बिजीरण करण्याचा निर्णय घेतला होता. लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे जीपीएस टॅगिंगदेखील करण्यात येणार होते. यामुळे समस्या सुटेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. यासाठी प्रति श्वान ६०० रुपये खर्च येणार होता. त्यासाठी अंदाजपत्रकात खर्चाची तरतूदही वाढविण्यात आली. मात्र त्यांनतरही विभागाने याबाबत कार्यवाही न केल्याने कुत्र्यांची दहशत कायम आहे.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *