facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / साकतचे वीज उपकेंद्र अडकले लालफितीत
news-18

साकतचे वीज उपकेंद्र अडकले लालफितीत

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – अघाडी सरकारच्या काळात चार वर्षांपूर्वी तालुक्यातील साकत येथे मंजूर झालेले ३३ केव्ही वीज उपकेंद्र जागेच्या वादावरून लालफितीत अडकले आहे. मंजूर वीज उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, यासाठी साकत गावचे माजी सरपंच हनुमंत पाटील मुरूमकर यांच्यासह ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. महावितरणचे उप कार्यकरी अभियंता संदीप शिंदे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आघाडी सरकारच्या काळात २०१३ मध्ये साकत येथे ३३ केव्ही हे उपकेंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी महावितरणने उपकेंद्रासाठी लागणारी जागा गट नं. ९२०-४० आर एवढी स्थापत्य विभागाने खरेदी खताने घेतली असून उताऱ्यावर तसे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अशी नोंदही झालेली आहे. हे काम जानेवारी २०१७ पर्यंत संबंधीत एजन्सीला पूर्ण करावयाचे आहे; मात्र, सध्या हे काम जागेच्या वादावरून रखडले आहे. हे काम मार्गी लागले तर परिसरातील साकत बरोबरच पिंपळवाडी, कोल्हेवाडी कडभनवाडी सावरगाव या ठिकाणच्या गावांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार आहे. तरी वीज उपकेंद्र लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी साकत येथील माजी सरपंच हनुमंत पाटील, चेअरमन हनुमंत माणिक पाटील, सदाशिव वराट, श्रीराम घोडेस्वार, दादा वराट, जालिंदर नेमाने, डॉ. बापू वराट, गणेश वराट, माजी संचालक संपत मुरूमकर, नाना लहाने, युवा नेते गणेश मुरूमकर आदी जामखेड तहसीलसमोर बेमुदत उपोषणास बसले. उपोषणास्थळी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता संदीप शिंदे, सहायक अभियंता युवराज परदेशी, नायब तहसीलदार शिल्पा पाटील, कनिष्ठ अभियंता वैभव थोरे यांनी भेट दिली. संदीप शिंदे यांनी, संपादित केलेल्या जागेसंदर्भात तक्रार आली होती. यामुळे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून चाैकशी सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना मिळताच एका महिन्यात उपकेंद्राचे काम सुरू करण्यात येईल, असे लेखी अश्वासन दिले.

कोट – गावातील राजकीय वादामुळे चार वर्षांपासून साकत येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्र होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या कळी असलेल्या तलाठ्यांनी खोटा दाखला दिला या मुळे महावितरणने खासगी जागा घेतली आहे; मात्र, ग्रामस्थांनी शासकीय जागेत उपकेंद्र करा, अशी मागणी केली आहे. महावितरण एकाच वेळी दोन ठिकाणी जागा घेऊ शकत नाही. या प्रकरणी मुंबई येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर वाघ यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची भेट घेतली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.

– दत्तात्रय कोळी, अधीक्षक अभियंता, अहमदनगर

चौकट –

तलाठ्याकडून खोटा दाखला

काही वर्षांपूर्वी साकत येथील तलाठी पांडुळे यांनी महावितरणच्या ३३ केव्ही वीज उपकेंद्रासाठी साकत परिसरात शासकीय जागा उपलब्ध नाही, असा दाखला महावितरणास दिला होता. या मुळे महावितरणने खासगी जागा विकत घेतली आहे. ही गोष्ट विरोधकांच्या लक्षात आल्यानंतर या बाबत शासकीय जागा या ठिकाणी आहे, अशी बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर तलाठी यांनी खोटा दाखला दिल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. या मुळे त्या काळी असलेले तलाठी पांडुळे यांना प्रशासनाने तातडीने निलंबित केले होते.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *